Vidhan Sabha 2019 : खेडमध्ये सात मतदान यंत्रात बिघाड 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

खेड - तालुक्‍यात सकाळपासूनच मोठ्या उत्साहात मतदानाला सुरवात झाली. दापोली मतदारसंघातील खेड तालुक्‍यातील तिसंगी नवानगर येथे मतदान यंत्र, व्हीव्हीपॅट यंत्र बंद पडले. तिथे तत्काळ दुसरे यंत्र देण्यात आले.

खेड - तालुक्‍यात सकाळपासूनच मोठ्या उत्साहात मतदानाला सुरवात झाली. दापोली मतदारसंघातील खेड तालुक्‍यातील तिसंगी नवानगर येथे मतदान यंत्र, व्हीव्हीपॅट यंत्र बंद पडले. तिथे तत्काळ दुसरे यंत्र देण्यात आले.

निळवणे येथेही बंद पडलेले व्हीव्हीपॅट यंत्र बदलण्यात आले. गुहागर मतदारसंघातील खेड तालुक्‍यातील शिरगाव, लवेल, संगलट, अंजनी व सार्पिली येथे मतदान यंत्रे सकाळी बंद पडली होती. त्या ठिकाणी तातडीने दुसरी मतदान यंत्रे देण्यात आली. यानंतर मतदान सुरळीत सुरू झाले.

चिंचघरमध्ये आमदार कदमांचे मतदान

आमदार संजय कदम यांनी चिंचघर-प्रभूवाडी गावात पत्नीसमवेत मतदानाचा हक्क बजावला. जामगे येथे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी त्यांच्या कुटुंबीयांसमवेत मतदान केले. या वेळी विधानसभेचे उमेदवार योगेश कदम, दुसरे पुत्र सिद्धेश कदम, बंधू जिल्हा परिषदेचे सदस्य अरुण कदम यांनीही मतदान केले. मतदानानंतर योगेश कदम, आमदार संजय कदम यांनी मतदारसंघात मतदानाचा आढावा घेण्यासाठी खेड, मंडणगड आणि दापोली येथील मतदान केंद्रांना भेटी दिल्या. खेड तालुक्‍यात पावसाच्या भीतीने सकाळच्या सत्रात मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गर्दी होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर तसेच बाहेर अतिरिक्त पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवला होता.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Seven voting machines fail in the Khed