Vidhan Sabha 2019 : शिवसेनेने राणे कुटुंबाचा पराभव कितीवेळा करावा?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

देवगड - सध्याच्या भात कापणीबरोबरच राजकारणातील विषवल्लीही कापून टाकण्याचे पवित्र कार्य मतदारांनी करावे, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी तालुक्‍यातील वळीवंडे येथील जाहीर सभेत केले. शिवसेनेने राणे कुटुंबाचा पराभव कितीवेळा करावा? असे सांगत नारायण राणे आणि नीलेश राणे यांचा प्रत्येकी दोनवेळा पराभव केला असून आता नीतेश राणे यांची वेळ असल्याचेही त्यांनी सांगितले. 

देवगड - सध्याच्या भात कापणीबरोबरच राजकारणातील विषवल्लीही कापून टाकण्याचे पवित्र कार्य मतदारांनी करावे, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी तालुक्‍यातील वळीवंडे येथील जाहीर सभेत केले. शिवसेनेने राणे कुटुंबाचा पराभव कितीवेळा करावा? असे सांगत नारायण राणे आणि नीलेश राणे यांचा प्रत्येकी दोनवेळा पराभव केला असून आता नीतेश राणे यांची वेळ असल्याचेही त्यांनी सांगितले. 

शिवसेना उमेदवार सतीश सावंत यांच्या प्रचारार्थ वळीवंडे येथील जाहीर सभेत श्री. देसाई बोलत होते. सतीश सावंत यांच्या कार्यकतृत्वाबद्दल त्यांनी गौरोवोद्‌गार काढले. मंचावर श्री. सावंत यांच्यासह खासदार विनायक राऊत, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, संदेश पारकर, जिल्हा उपप्रमुख विलास साळसकर, तालुकाप्रमुख मिलिंद साटम, प्रसाद करंदीकर, नीलम सावंत - पालव, अप्पा पराडकर, उपसभापती संजय देवरूखकर, नीलेश सावंत उपस्थित होते. 

गुंतवणूक वाढीसाठी एअरपोर्ट कनेक्टिव्हीटी वाढविण्याची गरज - मुख्यमंत्री सावंत 

श्री. देसाई म्हणाले, ""सचोटीचा कारभार करून सहकाराचा झेंडा फडकवत ठेवणारे सावंत यांचे नेतृत्व आहे. ग्रामीण भागाच्या समस्या जाणणारे उमेदवार आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना उध्दव ठाकरे यांनी उमेदवारीचा मुकुट घातला असून तो उजवळण्याचे काम मतदारांनी करावे. राज्यात 220 पेक्षा अधिक जागा युती जिंकेल. विरोधकांना विरोधीपक्ष नेताही नसेल. नाणारला आमचा आजही ठाम विरोध असून रोजगाराची पर्यायी व्यवस्था शिवसेना करील; मात्र उमेदवारीसाठी नाणारमधील कुटुंबे उद्‌ध्वस्त करणाऱ्यांना मतदारांनी नाकारावे.'' 

कोल्हापूर : राष्ट्रवादी, स्वाभिमानीला मोठा धक्का, महिला जिल्हाध्यक्षा, संघटनेचे नेते भाजपमध्ये 

भाजपने उमेदवारी दिलीच कशी? 
श्री. राऊत म्हणाले, ""ठेकेदाराशी साटेलोटं ठेवून अधिकाऱ्यांवर चिखल ओतणारे नकोत. अप्पासाहेब गोगटे, अजित गोगटेंप्रमाणे जनमानसातील नेतृत्व म्हणजे सतीश सावंत आहेत.'' 

श्री. पारकर यांनी नीतेश राणेंविरूध्द टाहो फोडणाऱ्या भाजपने त्यांना उमेदवारी कशी दिली? असा प्रश्‍न उपस्थित करून त्यांनी राणे कुटुंबावर टीका केली. दरम्यान, अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्षात प्रवेश केला. 

कोण काय म्हणाले? 

  • विचारांची श्रीमंती असलेला उमेदवार म्हणजे सावंत - विनायक राऊत 
  • "जनाधाराबरोबरच राणेंचे राजकीय मुल्यही संपलेले' - संदेश पारकर 
  • "रात्रीस खेळ चाले'प्रमाणे राणेंचा "नियतीचा खेळ चाले' - सतीश सावंत 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Subhash Desai comment