कोल्हापूर : राष्ट्रवादी, स्वाभिमानीला मोठा धक्का, महिला जिल्हाध्यक्षा, संघटनेचे नेते भाजपमध्ये

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 October 2019

  • शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शाखेच्या जिल्हाध्यक्ष संगीता खाडे यांचा भाजपमध्ये प्रवेश.
  • काँग्रेसकडून कोल्हापूरमधून उत्तरमधून उमेदवारीसाठी इच्छुक असणारे दौलत देसाई हेही भाजपच्या वाटेवर. 
  • दाैलत देसाई यांचा रविवारी होणार भाजपमध्ये प्रवेश. 

कोल्हापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शाखेच्या जिल्हाध्यक्ष संगीता खाडे यांनी आज शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसकडून कोल्हापूरमधून उत्तर मतदारसंघामधून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले दौलत देसाई हेही भाजपच्या वाटेवर आहेत. रविवारी त्यांचा भाजपमध्ये प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे.

Vidhan Sabha 2019 : गोव्याचे मुख्यमंत्री म्हणाले, महाडिक यांचे महायुतीत उज्वल भविष्य 

पालकमंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपचा बूथ लेवल कार्यकर्ता मेळावा झाला. त्यात काटे व सौ. खाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या दोघांचे मंत्री पाटील यांनी भाजपमध्ये स्वागत केले. यावेळी कोल्हापूर दक्षिणचे उमेदवार अमल महाडिक, माजी खासदार धनंजय महाडिक, जिल्हा परिषद अध्यक्षा शाैमिक महाडिक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव  हे उपस्थित होते. 

भगवान काटे हे दीर्घकाळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहिले आहेत. ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांचे जिल्ह्यातील बिनीचे शिलेदार आहेत. त्यांचा भाजप प्रवेश शेतकरी संघटनेला मोठा धक्का आहे. संगीता खाडे या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सदस्या होत्या. तसेच राष्ट्रवादीच्या महिला शाखेच्या जिल्हाध्यक्ष होत्या. त्यांच्या घरातच राष्ट्रवादीचे कार्यालय होते. अलीकडेच त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. तसेच आपल्या घरातून पक्षाचे कार्यालय हलवावे, अशी विनंती केली होती.

Vidhan Sabha 2019 : ...यासाठी महायुतीला साथ द्या; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे आवाहन 

दौलत जयकुमार देसाई हे शिक्षणमहर्षी कै. एम. आर. देसाई यांचे नातू होत. त्यांनी कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी केली होती. परंतू येथून काँग्रेसने उद्योगपती चंद्रकांत जाधव यांना ऐनवेळी पक्षाची उमेदवारी दिली. त्यामुळे ते नाराज झाले होते. ते रविवारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते. यासाठी स्वतंत्र कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. 

Vidhan Sabha 2019 : सेनेला भाजपच्या मतांची गरज वाटत नाही का ?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhagawan Kate, Sangita Khade enters in BJP in Kolhapur