रसायनी येथे विज महावितरणच्या कामाने नागरिकांना दिलासा

लक्ष्मण डूबे 
रविवार, 6 मे 2018

पावसामुळे विज पुरवठा पुर्ववत करताना अनेक अडचणी येतात. सुरक्षितेचा उपाय म्हणुन महावितरण कंपनीने आगोदरच झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम सुरू केले आहे. 

रसायनी (रायगड) - वासांबे मोहोपाडा विज महावितरण कंपनी सहाय्यक अभियंता कार्यालय हद्दीतील गावात पावसाळ्यात विज पुरवठा सुरळीत सुरू असावा, त्यासाठी कंपनीच्या कर्मचा-यांनी पावसाळ्या पूर्वीचे काम सुरू केले आहे. यंदाच्या वर्षी वेळेत काम सुरू केली असल्याने ग्राहाकांनी समाधान व्यक्त केले आहे. 

पावसाळ्यात विज मार्गाजवळील झाडांच्या फांद्या विज वाहिन्यांनवर निखळुन पडतात किंवा वाहिन्यांना फांद्या लागुन विज पुरवठा खंडित होतो. विज पुरवठा बंद पडला की ग्राहकांची गैरसोय होते. तसेच पावसामुळे विज पुरवठा पुर्ववत करताना अनेक अडचणी येतात. सुरक्षितेचा उपाय म्हणुन महावितरण कंपनीने आगोदरच झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम सुरू केले आहे. 

शुक्रवार (ता. 4) ला पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात, मोहोपाडा मुख्य रस्ता तसेच पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील कामगार वसाहत या ठिकाणी रस्त्याच्या कडेची विज वाहिन्यांजवळील फांद्या तोडल्या आहे, असे सांगण्यात आले. तर बाकी ठिकाणांच्या गावातील विज वाहिन्यांजवळील झाडांच्या फांद्या पावसाळ्यापर्यंत तोडल्या जातील, असे सहाय्यक अभियंता किशोर पाटील यांनी सांगितले. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Vij Mahavitaran is working before the monsoon