पंडितांची पद सोडण्याची शपथ वैयक्‍तिक - चाळके

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 डिसेंबर 2018

रत्नागिरी - राहुल पंडित यांना नगराध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे पक्षाकडून कोणतेही आदेश नव्हते. त्यांनी घेतलेली शपथ ही वैयक्‍तिक आहे. त्यांच्या राजीनाम्याचे पत्र पक्षाचे सचिव खासदार विनायक राऊत यांच्याकडे पाठवले आहे,अशी माहिती जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी दिली.

राहुल पंडित यांनी भैरी मंदिरात दिलेले राजीनामा पत्र यावरून गेले दोन दिवस सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी जिल्हाप्रमुख चाळके, शहरप्रमुख बिपिन बंदरकर, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे यांनी पत्रकार परिषद घेतली. 

ही वादळापूर्वीची शांतता
नीलेश राणेंकडून होत असलेल्या आरोपांविषयी आम्ही आता उत्तर देणार नाही. ही वादळापूर्वीची शांतता आहे. योग्यवेळी उत्तर दिले जाईल, असे शेरे यांनी ठणकावले. चाळके म्हणाले, राणेंकडून होत असलेली वक्‍तव्य जनता मान्य करणार नाही.

श्री. चाळके म्हणाले, ‘‘शिवसेना पक्ष आदेशावर चालतो. पंडित यांनी राजीनाम्याविषयी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी कोणतीही चर्चा केलेली नव्हती. तो निर्णय त्यांचा स्वतःचा आहे. नगराध्यक्ष उमेदवार ठरविण्यापूर्वी पंडित यांनी भैरी मंदिरात जाऊन घेतलेल्या शपथेचा कार्यक्रम वैयक्‍तिक आहे. त्याचा पक्षाशी कोणताही संबंध नाही. दोन वर्षानंतर त्यांनी दिलेले पत्रही पक्षाच्या आदेशानुसार नाही. त्यामुळे पंडित आजही नराध्यक्षपदावर कार्यरत आहेत.

जिल्हाप्रमुख म्हणून माझ्याकडे दिलेले पत्र आणि वस्तुस्थिती वरिष्ठांपुढे मांडली आहे.’’ ‘नगराध्यक्षांना सभागृहामध्ये सहकारी नगरसेवकांनी साथ दिली नसेल, तर ती गोष्ट दुर्दैवी आहे; मात्र यासंदर्भात पंडित यांनी पक्षाकडे केव्हाच तक्रार केलेली नाही. भविष्यातही ते असाच विकास साधतील.‘शिवसेना पक्ष शपथेवर चालत नाही, तर आदेशावर चालतो. पक्षप्रमुखांचा आदेश आल्यानंतर त्याची कार्यकर्ते अंमलबजावणी करतात. त्यांच्या पत्रावर योग्य तो विचार पक्षाकडून केला जाईल. नगराध्यक्षांनी दोन वर्षात केलेले कामकाज समाधानकारक आहे. त्यांच्यासंदर्भात घेतलेल्या सर्व्हेमध्ये जनताही पंडित यांच्या बाजूने आहे. शिवसेना नेहमीच जनतेच्या मताचा आदर करते,’ असे शहरप्रमुखांनी सांगितले. 

विषय समिती निवडीनंतर बदल बाहेरून पक्षात कोणाला आणण्यासंदर्भात अद्यापही निर्णय झालेला नाही. उपनगराध्यक्ष बदल हा निश्‍चित आहे. विषय समित्यांची निवड झाल्यानंतर त्यावर निर्णय घेतला जाईल, असे चाळके यांनी सांगितले.

Web Title: Vilas Chalke comment