न्हावेली-रोणापाल रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

सावंतवाडी - स्वातंत्र्योत्तर काळातील सुमारे 3 किलोमीटरचा सर्वात जुना मातीचा जोड रस्ता न्हावेली, पाडलोस व रोणापाल अजूनही खडीकरण व डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. गेली अनेक वर्षे या रस्त्याच्या डागडुजीसाठी ग्रामस्थ मागणी करत आहेत; परंतु लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्यामुळे हा रस्ता अद्याप माती दगडापासून केलेल्या स्थितीतच आहे. 

याकडे शिवसेना पंचायत समिती सदस्य रेश्‍मा नाईक व तालुका संपर्क प्रमुख राजू नाईक यांचे लक्ष वेधले असता त्यांनी पाहणी करून तिन्ही गावांच्या विकासासाठी हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून किंवा इतर निधीतून पूर्णत्वास आणू, असे आश्वासन दिले. 

या वेळी विभाग प्रमुख गुरुनाथ नाईक, उपतालुका प्रमुख राजू शेटकर, शाखा प्रमुख महेश कुबल, प्रभाकर कुबल, रंजन नाईक, विठ्ठल नाईक, भूषण केणी, युवासेना शाखाध्यक्ष समीर (विठू) नाईक, सिद्धेश कोरगावकर, बंटी नाईक, बबलू नाईक, अनिकेत अमरे, सुनील परब, आबा गवस, अमोल नाईक, नितीन गवस, पप्पू कुबल आदी ग्रामस्थ उपस्थित होते. 

न्हावेली, पाडलोस व रोणापाल गावच्या विकासासाठी प्रामुख्याने रस्ता पाहिजे. हा रस्ता या तिन्ही गावांच्या विकासाचे माध्यम ठरेल, अशी स्थिती आहे. यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना किंवा इतर निधीतून रस्त्याचे काम कसे मार्गी लागेल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे रेश्‍मा नाईक यांनी सांगितले. 

न्हावेली-रेवटेवाडी, सोनुर्ली-पोटयेकुंभवाडी, पाडलोस केनिवाडा, भाकरवाडी, सातींगमळी तसेच रोणापाल गावातील शेकडो ग्रामस्थांना या रस्त्याचा लाभ होणार आहे. पूर्वी याच रस्त्याने गावातील ग्रामस्थ बांदा येथे बाजारात चालत ये-जा करत. सध्या येथून तीनचाकी रिक्षा जाणे धोक्‍याचे झाले आहे. या रस्त्यावरून रुग्णास रुग्णालयात नेईपर्यंत इतरांना तारेवरची कसरत करावी लागते. आपण खासदार विनायक राऊत यांचे या रस्त्याकडे लक्ष वेधून तिन्ही गावांचा विकास साधण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे सावंतवाडी तालुका संपर्क प्रमुख राजू नाईक यांनी रस्ता पाहणी वेळी सांगितले. 

मळेवाड जिल्हा परिषद विभागातील या रस्त्याकडे विभागप्रमुख गुरुनाथ नाईक व उपतालुका प्रमुख राजू शेटकर, शाखाप्रमुख महेश कुबल यांनी पंचायत समिती सदस्य व तालुकसंपर्क प्रमुखांचे लक्ष वेधले. या वेळी गावातील अन्य समस्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसमोर मांडल्या. बेरोजगार युवकांसाठी रोजगार मिळून देण्याचे शाखाप्रमुख महेश कुबल यांनी सांगितले.

Web Title: Villager demand for road repair