आरोंदा ग्रामस्थांचे उपोषण सुरू 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

सावंतवाडी - आरोंदा मानसीवाडी बंधाऱ्याच्या डांबरीकरणाच्या विरोधात ग्रामस्थांनी आज पुकारलेल्या उपोषणानंतरही हा प्रश्न कायम राहिला. डांबरीकरण करण्यापूर्वी बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूंनी संरक्षक भिंत बांधा, अशी मागणी त्यांनी लावून धरली; परंतु संरक्षक भिंत ही खर्चिक बाब असल्यामुळे उपस्थित अधिकारी अनुत्तरित झाले. त्यामुळे हे उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. 

सावंतवाडी - आरोंदा मानसीवाडी बंधाऱ्याच्या डांबरीकरणाच्या विरोधात ग्रामस्थांनी आज पुकारलेल्या उपोषणानंतरही हा प्रश्न कायम राहिला. डांबरीकरण करण्यापूर्वी बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूंनी संरक्षक भिंत बांधा, अशी मागणी त्यांनी लावून धरली; परंतु संरक्षक भिंत ही खर्चिक बाब असल्यामुळे उपस्थित अधिकारी अनुत्तरित झाले. त्यामुळे हे उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. 

तालुक्‍यातील आरोंदा येथील मानसीवाडी ते भटपावणी हा बंधारा खार लॅंड विभागाच्या मालकीचा आहे. या बंधाऱ्यावर डांबरीकरण करण्याची मागणी गावातील एका गटाकडून केली होती. त्यानुसार पालकमंत्री दीपक केसरकर यांनी डांबरीकरणासाठी पैसे मंजूर केले. त्यानुसार बांधकाम विभागाला डांबरीकरण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार डांबरीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती; परंतु बंधारा मातीचा असल्यामुळे त्या बंधाऱ्यांच्या दोन्ही बाजूंनी संरक्षक भिंत बांधावी आणि त्यानंतरच डांबरीकरण करावे, अशी भूमिका उपोषणकर्त्यांसह ग्रामस्थांची आहे. त्यासाठी त्यांनी आज उपोषण पुकारले. सकाळी सात वाजल्यापासून वाडीतील सुमारे दीडशेहून अधिक महिला आणि पुरुष यात सहभागी झाले होते.

उपोषणकर्त्यांना दुपारी उशिरा बांधकाम विभागाच्या सहायक अभियंत्या अनामिका चव्हाण, खारलॅंड विभागाचे कार्यकारी अभियंता वसंत हरोलीकर, संदीप देसाई, सहायक पतन अभियंता योगेश कंगनकर, सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी सावंत यांनी भेट दिली. यावेळी उपस्थित उपोषणकर्त्यांशी अधिकाऱ्यांनी चर्चा केली. त्यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केली; परंतु जोपर्यंत संरक्षक भिंत उभारण्याबाबत ठोस आश्वासन दिले जात नाहीत तोपर्यंत साखळी उपोषण सुरूच ठेवणार असल्याची भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली. यावेळी गोपाळ नाईक, परशुराम नाईक, रमाकांत नाईक, दिलीप नाईक, गोकुलदास मोटे, अनंत नाईक, विश्राम नाईक, सुरेश नाईक, नरेश देऊलकर, सदानंद नाईक, भगवान नाईक, सूर्यकांत नाईक, वामन नाईक, सोनू चुनेकर, सातू नाईक, हरिश्‍चंद्र नाईक, लाडू नाईक, गजानंद नाईक, अंकिता नाईक, पुष्पावती नाईक, गोविंद केरकर, द्वारका नाईक, सुनीता चुनेकर, सानिका नाईक, भक्ती नाईक, तारुलता नाईक, अंजली नाईक, कल्पिता नाईक, वनिता नाईक, अंकिता नाईक, रेवती नाईक, उर्मिला नाईक, छाया नाईक, पुष्पावती नाईक, संगीत नाईक, वैशाली नाईक, गंगावती चुनेकर, रेवती नाईक, प्रणिता नाईक, सुजल नाईक, गीता नाईक, वर्षां नाईक, अनुजा नाईक, सरपंच उमा बुडे, भाग्यश्री नाईक, प्रतीक्षा नाईक, सुंदरा नाईक, गायत्री नाईक, चेतन नाईक, सरस्वती नाईक, सुमेधा नाईक, सावित्री नाईक, सुभद्रा नाईक उपस्थित होते. या वेळी मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष गोकुलदास मोटे यांनी भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला. 

पालकमंत्री, खासदारांच्या माध्यमातून प्रश्न सोडवणार 
आरोंदा मानसीवाडी बंधारा उपोषणप्रकरणी शिवसेना तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य रुपेश राऊळ यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा व्यक्त केला. या वेळी त्यांनी खासदार विनायक राऊत व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याशी संवाद साधला व त्यांच्या माध्यमातून बधाऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी निधी आणणार असल्याचे सांगितले. 

Web Title: Villagers started hunger strike