Loksabha 2019 : राणे, तुमचा पंचनामा करायला लावू नका 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

रिफायनरीला विरोधात होता, तर एकदा तरी सभागृहात त्याबाबत तोंड उघडले का? स्वतः अडाणी असणाऱ्यांनी दुसऱ्याला ज्ञान शिकवू नये. आम्ही एकेकाळी सहकारी होतो. तेव्हा राणे यांना भाषण, लेख कोण लिहून द्यायचे हे मला बोलायला लावू नका. आम्ही तुमचे पुस्तक उघडले तर खूप आहे.

- विनायक राऊत 

रत्नागिरी - सेल्स टॅक्‍समध्ये चपराशी (शिपाई) असलेल्या नारायण राणे यांनी मला नॉन मॅट्रीक म्हणून हिणवू नये. नॉन मॅट्रिकचे स्पेलिंगही त्यांना लिहिता येणार नाही. मी स्टेनो ग्राफर होतो, आम्ही पुस्तक उघडले तर खूप आहे. तुमचा पंचनामा करायला लावू नका, असा इशारा युतीचे उमेदवार विनायक राऊत यांनी दिला. 

श्री. राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. श्री. राऊत म्हणाले, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कालच्या सभेमध्ये विद्वान नेते नारायण राणे दोन वेळा मला नॉन मॅट्रिक म्हणाले. त्याला उत्तर देणे आवश्‍यक होते. माझ्यावर आरोप करणाऱ्या राणे यांनी तीन वर्षांमध्ये सर्वोच्च सभागृहात शून्य वेळा तोंड उघडले. नीलेश राणे यांनी 19 वेळा आणि मी सव्वाशे ते दीडशेवेळा कोकणातील प्रश्‍न मांडले. त्यामुळे तुम्ही काय दिवे लावले ते सांगा.

रिफायनरीला विरोधात होता, तर एकदा तरी सभागृहात त्याबाबत तोंड उघडले का? स्वतः अडाणी असणाऱ्यांनी दुसऱ्याला ज्ञान शिकवू नये. आम्ही एकेकाळी सहकारी होतो. तेव्हा राणे यांना भाषण, लेख कोण लिहून द्यायचे हे मला बोलायला लावू नका. आम्ही तुमचे पुस्तक उघडले तर खूप आहे.

- विनायक राऊत 

श्री. राऊत म्हणाले, ही लोकसभेची निवडणूक आहे. विकासकामांवर बोला. आम्ही विकासकामांच्या जोरावरच निवडणुकीला सामोरे जात आहोत. देशहिताचे प्रश्‍न महत्त्वाचे असले पाहिजेत. केंद्र, राज्य शासनाच्या योजनांचा मतदारांना कसा फायदा होणार, यावर भर दिला पाहिजे. उणीदुणी काढण्यात काही अर्थ नाही.त्यामुळे युतीच्या सत्तेने ब्रिटिशकालीन 1200 कायदे रद्द केले. विकास हाच आमचा ध्यास आहे. 

सिंधुदुर्गमधील जास्त गाड्या 
स्वाभिमानचे उमेदवार नीलेश राणे यांना सेना - भाजपचा आतून पाठिंबा आहे, असे वक्तव्य काल खासदार नारायण राणे यांनी केले. याला उत्तर देताना श्री. राऊत म्हणाले, आतून पाठिंबा द्यायला सेना - भाजपमध्ये बेईमानी आणि गद्दारी नाही. ती गद्दारी राणेंमध्ये भिनली आहे. त्यांच्या वक्तव्याची दखल घेण्याची गरज नाही. निवडणुकीत अशा भुलथापा मारण्याची त्यांची पद्धतच आहे. कालच्या मेळाव्यात स्थानिक कमी आणि सिंधुदुर्गमधील जास्त गाड्या होत्या.तर युतीच्या मेळाव्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vinayak Raut comment