नगर पंचायतसाठी शिवसेना-राष्ट्रवादीची आघाडी

मागील 5 वर्षांत दुर्लक्षित राहिलेला विकास, सत्ताधाऱ्‍यांची चुकीची कार्यपद्धती आघाडीला विजयाच्या समीप नेईल
konkan
konkanesakal
Summary

मागील 5 वर्षांत दुर्लक्षित राहिलेला विकास, सत्ताधाऱ्‍यांची चुकीची कार्यपद्धती आघाडीला विजयाच्या समीप नेईल

देवगड : येथील देवगड जामसंडे नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. यामध्ये काँग्रेसला सामावून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आज दुपारपर्यंत काँग्रेसची आघाडीसाठी वाट पाहू, अन्यथा जागा वाटप होईल, असे खासदार विनायक राऊत यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. मागील पाच वर्षांत दुर्लक्षित राहिलेला विकास, सत्ताधाऱ्‍यांची चुकीची कार्यपद्धती आघाडीला विजयाच्या समीप नेईल, असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. येथील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात राऊत पत्रकारांशी बोलत होते.

राऊत म्हणाले, 'नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेची महाविकास आघाडी असावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली असून, त्यामध्ये काँग्रेसला सामावून घेण्याचा विचार आहे. काँग्रेस यामध्ये सामील झाली तर त्यांचे स्वागत आहे. अन्यथा जागावाटप करून निवडणुकीला सामोरे जाऊ. नगरपंचायतीमध्ये सत्ताधाऱ्यांनी विकासासाठी आलेला निधी कुठे खर्च केला याची माहिती जनतेला आहे. काही प्रभाग दुर्लक्षित राहिले असल्याने त्याची नाराजी मतदानातून दिसेल. तसेच जिल्हा बँक निवडणुकीत सर्व १९ जागा महाविकास आघाडी जिंकेल. सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखालील बँकेचे कामकाज सुरळीत चालले आहे. बँकेची १५०० कोटींची उलाढाल त्यांनी २४०० कोटींपर्यंत नेली आहे. त्यामुळे सकारात्मक चित्र असल्याने बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय निश्‍चित आहे.'

konkan
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाघाचे अस्तित्व वनविभागानकडून मान्य

यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, शिवसेना नेते अतुल रावराणे, संदेश पारकर, तालुका प्रमुख मिलिंद साटम, विलास साळसकर, माजी सभापती रवींद्र जोगल, जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब, उपतालुकाप्रमुख निवृत्ती ऊर्फ बुवा तारी, राष्ट्रवादीचे चंद्रकांत पाळेकर, बंटी कदम यांच्यासह अन्य उपस्थित होते.

नागरिकांना हवे परिवर्तन

नागरिकांना नगरपंचायत निवडणुकीत परिवर्तन हवे आहे. त्यामुळे देवगडचे राजकीय भवितव्य शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या हाती देण्याची स्थानिक जनतेची इच्छा दिसत असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.

konkan
शिवसेनेचे इच्छुक उमेदवार चिंतेत; सूत्रं आता माजी आमदारांकडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com