शेतकरी आंदोलनामागून विरोधकांचे राजकारण ः विनोद तावडे यांचा आरोप

Vinod Tawade Comment Oppositions Politics behind  Farmers Agitation
Vinod Tawade Comment Oppositions Politics behind Farmers Agitation

रत्नागिरी - गेल्या काही वर्षात नोकरदारांचे पगार वाढले, पण शेतकऱ्याचे उत्पन्न वाढले नाही. याच शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट कसे होईल, यासाठी हा कायदा केला आहे; मात्र शेतकरी आंदोलनातून त्याचं राजकारण केलं जात आहे, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय चिटणीस विनोद तावडे यांनी केला. तसेच कोकणातील आवाज दिल्लीपर्यंत पोचवण्यासाठी राष्ट्रीयस्तरावर मिळालेल्या या संधीचा उपयोग करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. 

भाजपच्या राष्ट्रीय चिटणीसपदी निवड झाल्याबद्‌दल रत्नागिरी जिल्हा कार्यकारणीतर्फे सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. काश्‍मीरमधील 370 कलम रद्द करतानाच रामजन्मभूमीत राममंदिर बांधण्याचे धाडस फक्‍त पंतप्रधान मोदी, शहा यांच्या नेतृत्त्वामुळेच शक्‍य झाले. काम आणि कामच यातून प्रेरित होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा कार्यरत आहेत. त्यांच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळाल्याचे तावडे यांनी सांगितले. 

दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाविषयी ते म्हणाले, दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनात राजकारण होत आहे. केंद्राच्या कृषी कायद्यात बाजार समितींना दुय्यम स्थान दिले आहे. या कायद्यामुळे शेतकऱ्यांना कुठेही जाऊन शेतमालाची विक्री करता येईल. शेतमालावर आधारित उद्योग, उद्योजक शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे; मात्र एका पंजाबच्या जोरावर शेतकरी आंदोलन सुरू आहे. आंदोलकांकडून काही अटी या शेतकऱ्यांशी निगडीत नाहीत. अन्याय होत असेल तर तो केंद्र सरकार सक्षमपणे सोडवेल. शरद पवार यांनीही या कायद्याविरोधात वक्‍तव्य केले.

कॉंग्रसने असाच कायदा केला, तेव्हा कोणीच बोलले नाही. शेतकऱ्यांच्या प्रत्येक न्याय मागणीचा विचार करूनच विधेयकातील कलम रद्द करायचे की कायदा यावर निर्णय घेईल. सदाभाऊ खोत यांनी हा कायदा कसा फायदेशीर आहे, यासाठी राज्यभर दौरे सुरू केले आहेत. 

विश्‍वास वृद्धींगत करेन 
कोकणातील माणसाला दिल्लीत काम करायची संधी मिळाली आहे. त्याचा पुरेपूर उपयोग मी करेन. त्यासाठी आवश्‍यक ती रचना लवकरच करणार आहे. आतापर्यंत कोकणवासीयांनी ठेवलेल्या विश्‍वासाला तडा जाऊ देणार नाही, उलटपक्षी तो वृद्धींगत करेन, असे तावडे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com