

Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti’s newly announced Raigad district executive committee with Vivek Subhekar and Sandesh Gaikwad leading the team.
Sakal
-अमित गवळे
पाली: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती रायगड जिल्हा कार्यकारिणी बैठक रविवारी (ता. 9) नागोठणे येथे लायन्स ऑफिस स्व. बाळासाहेब ठाकरे बालोद्यान येथे संपन्न झाली. या बैठकीत जिल्हा पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यावेळी विवेक सुभेकर यांची जिल्हा अध्यक्ष तर संदेश गायकवाड यांची जिल्हा कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. यावेळी उत्कृष्ट कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला.