रायगड - शाळेत साजरी झाली वृक्षपौर्णिमा

अमित गवळे
गुरुवार, 28 जून 2018

पाली (रायगड) : रोहा तालुक्यातील राजिप शाळा तळवली/दिवाळी बुधवारी (ता.27) वृक्ष पौर्णिमा साजरी करण्यात आली. परिसरात आढळणाऱ्या आणि जगतील अशा 400 बिया आणि 10 रोपे डोंगर भागात लावण्यात आले.

वटपौर्णिमा पूजेसाठी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झाडांच्या फांद्या तोडल्या जातात. हे थांबविणे जरा अवघड अाहे. मग शाळेच्या शिक्षीका सोनाल पाटील यांनी विद्यार्थ्यांसोबत परिसरात बिंयांची व रोपांची लागवड करण्याचा पर्यावरण स्नेही उपक्रम केला. त्यांनी व विद्यार्थ्यांनी बिया साठवण्याची सुरुवात मे महिन्यातच केली होती. यामध्ये प्रामुख्याने आंबा, जांभूळ, कोकम, फणस, उंबर, करंज व इतर काही बियांचा समावेश होता.

बुधवारी (ता.27) सकाळी परिपाठ झाल्यावर सारे जण तळवली आदिवासी वाडीकडे असलेल्या डोंगरावर गेले. सोनाली पाटील यांनी विद्यार्थ्यांना तेथीलतील नवीन झाडांची ओळख करून दिली. त्यानंतर तळवली शाळेचे मुख्याध्यापक पवार सर यांनी भराभर खड्डे खणून दिले. आधी रोपे लावून घेतली त्यानंतर खड्ड्यांमध्ये बिया पेरल्या गेल्या. 400 बिया पेरण्यासाठी तब्बल अडीच तास लागले. हे सारे अनुभवत असताना शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये वेगळीच ऊर्जा संचारली होती. सर्व बिया पेरताना मनात एकच विचार होता यातील निम्म्या बिया रुजल्या तरी मुलांची मेहनत खऱ्या अर्थाने सफल होईल. त्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे सोनाल पाटील यांनी सकाळला सांगितले.

तळवली शाळेत कचऱ्यातून कमाल हा उपक्रम गेल्या चार वर्षांपासून राबविला जात आहे. यात प्रामुख्याने वेस्ट मटेरियल पासून बेस्ट वस्तू तयार करण्यावर भर दिला जातो.

प्रत्येकांनी एक झाड तरी सणाला लावले पाहिजे. भावी पिढीमध्ये पर्यावरण संरक्षण व संवर्धन ही भावना रुजावी, निसर्गाच्या सानिध्यात शिक्षण मिळावे यासाठी आमच्याकडून केलेला हा एक छोटासा प्रयत्न आहे.
- सोनल पाटील, शिक्षिका, रा. जि. प. शाळा तळवली/दिवाळी
 
Web Title: vriksha pornima at school in raigad