Amba River Flood Water
sakal
पाली - परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मंगळवारी (ता. ८) सलग तिसऱ्या दिवशी वाकण जवळील मार्गावर पूरपरिस्थिती निर्माण झाली. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने तसेच अंबा नदी पुलाच्या दोन्ही बाजूंच्या जोड रस्त्यावर पाणी आल्याने दोन्हीकडची वाहतूक बंद करण्यात आली. परिणामी, वाकण-पाली मार्ग वाहतुकीसाठी पुन्हा एकदा पूर्णपणे ठप्प झाला आहे.