सावंतवाडी : स्वच्छता संदेशाने सजल्या भिंती

स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा; सावंतवाडी शहरातील जनजागृती
सावंतवाडी : स्वच्छता संदेशाने सजल्या भिंती

सावंतवाडी : स्वच्छ सर्वेक्षण २०२२ च्या धर्तीवर शहरात संरक्षक भिंतीवर स्वच्छतेबाबत संदेश पाहायला मिळत असून, या भिंती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. येथील नगर परिषदेने या वेळीही स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहभाग दर्शविला असून, विविध उपक्रम हाती घेतले आहेत. पालिकेला या अभियानाच्या माध्यमातून याआधी बक्षीसही मिळाले आहे. शिवाय, मागच्या अभियानात पालिकेला ओडीएफ प्लस मानांकन प्राप्त झाले आहे.

सावंतवाडी : स्वच्छता संदेशाने सजल्या भिंती
ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे पुन्हा ब्लॅक फंगसचा धोका? तज्ञ म्हणतात की..

सद्यस्थितीत शहरातील रस्त्यानजीकच्या सर्व भिंती स्वच्छतेच्या संदेशाने रंगू लागल्या आहेत. शहरातील स्वच्छतेत मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला आहे. ओला व सुका कचरा अशा प्रकारे कचऱ्याचे वर्गीकरण करण्याबरोबर नागरिकांना स्वच्छता राखण्यासाठी प्रशासनाकडून सजग करण्यात येत आहे. गतवेळी शहरात नारळाच्या खोडापासून बसण्यासाठी वस्तू बनवून त्याला वेगळी रंगरंगोटी करण्यात आली होती.

सावंतवाडी : स्वच्छता संदेशाने सजल्या भिंती
Bank Fraud : ED ची मोठी कारवाई; जप्त केली 26.59 कोटींची रोकड, दागिने

शहरात ठिकठिकाणी अशा कलाकृती पाहायला मिळाल्या होत्या. शहरातील बसस्थानकाच्या संरक्षक भिंती रंगविताना त्यावर रेखाटलेले ‘आय लव्ह सावंतवाडी’ हे चित्रही सोशल मीडियावर चांगलेच हिट झाले होते.

युद्धपातळीवर काम

पालिकेकडून संरक्षक भिंतीचा वापर स्वच्छतेबाबत संदेश देण्यासाठी केला जात असून, शहरातील या भिंतींवर वेगळाच लूक पाहायला मिळत आहे. सध्या हे काम युद्धपातळीवर सुरू असून, स्वच्छतागृह आदी सर्व गोष्टी रंगरंगोटी करून शहर स्वच्छ सर्वेक्षण अभियानासाठी सज्ज ठेवण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com