गंगापूजनामुळे गावागावांत उत्साह ; भजनासह कीर्तनाचा गजर

warkari return on pandharpur Excitement in the sindudurg villages kokan marathi news
warkari return on pandharpur Excitement in the sindudurg villages kokan marathi news

कडावल (सिंधुदूर्ग) : पंढरपूरहून आणलेल्या गंगाजलाचे विधिवत पूजन करण्याची परिसरात प्रथा आहे. आता माघ वारीसाठी पंढरपूरला गेलेले वारकरी माघारी परतल्याने गावोगावी गंगापूजनाचे कार्यक्रम होत आहेत. यानिमित्त गावजेवणाच्या पंगती उठत आहेत. हरिपाठ, भजन व कीर्तनाने रात्री जागू लागल्या आहेत. एकंदरीत गंगापूजनामुळे वारकऱ्यांच्या घरात आनंदी व उत्साही वातावरणनिर्मिती होत आहे.पंढरपूरला गेलेले वारकरी परत येताना सोबत चंद्रभागेचे जल तीर्थ म्हणून घेऊन येतात.

यंदा पंढरपूरला मोठ्या प्रमाणात वारकरी  

या पवित्र जलाला गंगाजल असे म्हटले जाते.  घरात आणलेल्या या गंगाजलाचे ब्राह्मणाच्या हस्ते विधिवत पूजन करण्याची प्रथा येथे पूर्वापारपासून प्रचलित आहे. आषाढ, कार्तिक व माघ इत्यादी तिन्ही वा-यांना जाणारे वारकरी आपल्या घरी परतल्यावर आवर्जून गंगापूजन करतात. सकाळी ब्राह्मणाच्या हस्ते विधिवत गंगापूजन झाल्यानंतर दुपारी उपस्थितांना महाप्रसादाचा लाभ दिला जातो. तर सायंकाळनंतर हरिपाठ, भजन, कीर्तन यांसारखे कार्यक्रम होतात. कडावल दशक्रोशीतून माघ वारीसाठी यंदा पंढरपूरला मोठ्या प्रमाणात वारकरी गेले होते. यातील बहुतेक सर्वजण आता पुन्हा आपल्या गावी परतले आहेत. परंपरेनुसार ते चंद्रभागेचे जल म्हणजेच गंगाजल सोबत घेऊन आले आहेत.

गावजेवणावळी सुरू 

या गंगाजलाचे विधिवत पूजन प्रत्येक वारकऱ्यांच्या घराघरात होत आहे. यजमानाच्या ऐपतीप्रमाणे कार्यक्रमाचे नियोजन होत आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या कुटुंबातील वारकरी गंगापूजनाच्या कार्यक्रमासाठी संपूर्ण गावाला निमंत्रित करत आहेत. ब्राह्मणाच्या हस्ते विधिवत पूजन करून गावजेवणासाठी मोठा खर्च करत आहेत. तर गरीब कुटुंबातील वारकरी या कार्यक्रमात डामडौल न करता काटकसरीने खर्च करत आहेत.

आनंदी वातावरण अन्‌ उत्साह
माघ वारीसाठी पंढरपूरला गेलेले वारकरी आता आपल्या गावी परतले आहेत. त्यामुळे प्रत्येक वारकऱ्याच्या घरात गंगापूजनाचे कार्यक्रम होत आहेत. यानिमित्ताने गावजेवणाच्या पंगती उठत आहेत. हरिपाठ, भजन व कीर्तनाने रात्री जागू लागल्या आहेत. एकंदरीत गंगापूजनामुळे वारकऱ्याच्या घरात आनंदी व उत्साही वातावरणनिर्मिती होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com