जलसंधारणाचा विद्यार्थ्यांकडून आदर्श

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 डिसेंबर 2016

मंडणगड - निवळी नदीवरील जलस्रोतांचे बळकटीकरण करण्याचा जणू धडाच मंडणगड नगरपंचायत व शहरातील लोकनेते गोपीनाथजी मुंडे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी यांनी घालून दिला. विद्यार्थ्यांनी श्रमदानाने नदीवर चार ठिकाणी बंधारे बांधले.

मंडणगड - निवळी नदीवरील जलस्रोतांचे बळकटीकरण करण्याचा जणू धडाच मंडणगड नगरपंचायत व शहरातील लोकनेते गोपीनाथजी मुंडे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी यांनी घालून दिला. विद्यार्थ्यांनी श्रमदानाने नदीवर चार ठिकाणी बंधारे बांधले.

जिल्हा परिषदेने जलस्रोतांचे रक्षणासाठी बंधारा मोहिमेची साद घातली आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत नगरपंचायतीच्या वतीने जलस्रोत बळकटीकरणाची मोहीम राबवण्यात आली. निवळी नदीवर जॅकवेलजवळ दोन ठिकाणी सिमेंटच्या पिशव्यांमध्ये माती भरून बंधारे बांधण्यात आले. नगराध्यक्षा श्रुती साळवी यावेळी उपस्थिती होत्या. यावेळी बांधकाम समिती सभापती आदेश मर्चंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

नगरपंचायतीच्या पाणी कमिटीचे सभापती सुभाष सापटे व नगरसेवक शांताराम भेकत प्रा. विनोद चव्हाण, मुकेश कदम यांनी विद्यार्थ्यांसमवेत स्वतः श्रमदान करून मार्गदर्शन केले. मंडणगड गांधी चौक येथे स्मशानभूमीजवळ आणखी दोन ठिकाणी विद्यार्थ्यांनी बंधारे बांधले. यावेळी नगरसेवक राजेश मर्चंडे, नगरसेविका स्नेहल मांढरे, नेत्रा शेरे, डॉ. शामराव वाघमारे, डॉ. संगीता घाडगे यांनीही श्रमदान केल्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला होता. मोहीम यशस्वी करण्यासाठी नगरपंचायतीचे मुखधिकारी संजय कांबळे यांच्या नियोजनाखाली कर्मचारी मनोज मर्चंडे, गणेश सापटे चंद्रकांत तलार, समीर सपाटे, संदीप डिके, प्रमोद मर्चंडे, शरद धोत्रे यांनी मेहनत घेतली.

जॅकवेलला बंधाऱ्यांचा उपयोग
चार बंधाऱ्यांची जागा जाणकार व तंत्रज्ञांच्या सल्ल्याने घेण्यात आली. या बंधाऱ्यांमुळे पाणीसाठा होऊन त्याचा फायदा जॅकवेलचे झरे व जलस्रोत अधिक प्रभावी होतील. तसेच स्मशानानजीकच्या बंधाऱ्यांमुळे तेथील नजीकच्या विहिरींना त्याचा फायदा मिळणार आहे. जलस्वराज्य व जवसंवर्धन याबाबत पुस्तकी शिक्षण न घेता विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात धडे घालून दिले. याबद्दल संबंधितांचे कौतुक होत आहे.

Web Title: Water conservation model students