सिंधुदुर्ग : तिलारी, देवघर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

सिंधुदुर्ग : तिलारी, देवघर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून गेल्या चोवीस तासात सरासरी 84.38 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. यामुळे तिलारी व देवघर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी दिली आहे. 

तिलारी आंतरराज्य प्रकल्पातून पुच्छ कालव्यातून तिलारी नदीत अतिरिक्त पाणी सोडण्यात येत आहे. सध्या नदीची पातळी 40.900 मीटर इतकी आहे. पाणी सोडल्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ होणार आहे. तिलारी नदी काठावरील कोनाळकट्टा, घोडगेवाडी, परमे, घोडगे, खानयाळे - आवाडे, मणेरी, कुडासे, साटेली – भेडशी येथील ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

देवघर धरणातून आजपासून विसर्ग 

कणकवली तालुक्यातील देवघर मध्यम प्रकल्पातून आजपासून 29 घ. मी. प्रतिसेकंद इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू होणार आहे. त्या अनुशंगाने घोणसरी, लोरे नं. 1, लोरे नं. 2, गडमट, पियाळी, वाघेरी या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

ही घ्या काळजी - 

  • नागरिकांनी रात्रीच्या वेळी नदी पात्रातून ये - जा करू नये 
  • नदीपात्रात कपडे धुण्यासाठी जाणाऱ्या महिला, गुरे सोडणारे शेतकरी यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी,
  • संबंधीत ग्रामपंचायतींनी पाणी सोडण्याविषयीची दवंडी गावामध्ये द्यावी 
  • तालुक्यातील बचाव पथके, पोहणारे यांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत 
  • शोध व बचाव साहित्य सुस्थितीत ठेवावे
  • पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता त्वरीत आवश्यक ते नियोजन करावे 
  • आपत्तीजनक परिस्थिती उद्भवल्यास जिल्हा नियंत्रण कक्षाशी तात्काळ संपर्क साधावा

जिल्ह्यात पावसाचा जोर कायम

जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून गेल्या चोवीस तासात सरासरी 84.38 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. 1 जून 2019 ते आजपर्यंत जिल्ह्यात सरासरी 3804.79 मि. मी पाऊस झाला आहे.

तालुका निहाय चोवीस तासात व कंसात एकूण झालेला पाऊस - सर्व आकडे मिलीमीटरमध्ये

दोडामार्ग 87 (4419), सावंतवाडी 125 (4193), वेंगुर्ला 49.06 (3873.32), कुडाळ 78 (3696), मालवण 17 (3065), कणकवली 134 (4118), देवगड 70 (2773), वैभववाडी 115 (4301)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com