रसायनी: पराडे आदिवासी वाडीचा सोडविला पाण्याचा प्रश्न

लक्ष्मण डूबे 
रविवार, 15 जुलै 2018

पराडे आदिवासी वाडीत सुमारे शंभर घर आहेत. नागरिकांना एचओसी कंपनी तर्फे पाणी पुरवठा करण्यात येत होता. कंपनी बंद होणार असल्याने कंपनीने मे मध्ये पाणी पुरवठा बंद केला आहे. तेव्हा दोन महिन्या पासुन नागरिकांना पाणी टंचाईला तोंड दयावे लागत होते. धुणे, भांडी यासाठी पाताळगंगा नदीच्या पाण्याचा वापार तर  पिण्यासाठी खाने आंबिवली येथुन पाणी आणावे लागत होते. पायपीट करताना हाल होत असल्याने नाराजी व्यक्त होत होती. 

रसायनी (रायगड) : चांभार्ली ग्रामपंचायतीच्या हद्दितील पराडे आदिवासी वाडीत भर पावसाळ्यात पाणी टंचाई जाणवत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. पाणी टंचाई वर मात करण्यासाठी उपसरपंच दत्तात्रेय जांभळे यांनी पुढाकार घेतला विंधन विहीर खोदुन पाणी टंचाईवर मात केली आहे. त्यामुळे वाडीतील आदिवासी बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे.

पराडे आदिवासी वाडीत सुमारे शंभर घर आहेत. नागरिकांना एचओसी कंपनी तर्फे पाणी पुरवठा करण्यात येत होता. कंपनी बंद होणार असल्याने कंपनीने मे मध्ये पाणी पुरवठा बंद केला आहे. तेव्हा दोन महिन्या पासुन नागरिकांना पाणी टंचाईला तोंड दयावे लागत होते. धुणे, भांडी यासाठी पाताळगंगा नदीच्या पाण्याचा वापार तर  पिण्यासाठी खाने आंबिवली येथुन पाणी आणावे लागत होते. पायपीट करताना हाल होत असल्याने नाराजी व्यक्त होत होती. 

दरम्यान ग्रामपंचायतीचे नुतन सरपंच बाळी कातकरी आणि उपसरपंच दत्तात्रेय जांगळे यांनी वाडीतील नागरिकांच्या पाणी टंचाईची दखल  घेतली. वाडीत ग्रामपंचायतीने विंधन विहीर खोदुन पाणी पुरवठा सुरू केला आहे. पदभार स्विकारल्या नंतर पंधरा दिवसांच्या आताच पाणी टंचाईचा प्रश्न सोडविल्याने आदिवासी वाडीतील आणि परीसरातील नागरिकांनी त्यांच्या कामाची स्तुती केली आहे. 

पाणी पुरवठा शुभारंभ प्रसंगी झालेल्या कार्यक्रमाला सरपंच बाळी कातकरी, उपसरपंच दत्तात्रेय जांभळे, उमेश मुंढे, प्रतीप  पाटील, प्रविण जांभळे, विनया मुंढे, राजश्री जांभळे, श्रृती कुरंगळे, उर्मिला ढवळे, नंदु कुरंगळे, विणायक ढवळे आणि आशोक सवार आदि उपस्थित होते. 

Web Title: water issue in rasayani