जिंदाल कंपनीचे पाणी बंद करून ग्रामस्थांना टँकर

जिंदाल कंपनीचे पाणी बंद करून ग्रामस्थांना टँकर

रत्नागिरी- निवळी, बावनदी परिसरातील ग्रामस्थांना पाणी मिळवून देण्यासाठी आमदार उदय सामंत यांनी आक्रमक होत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. शासनाच्या नियमानुसार पाहिलं पिण्यासाठी पाणी, नंतर कंपनीला या न्यायाचं उलघन करू नका. अन्यथा ग्रामस्थांचा उद्रेक होईल आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे ठणकावले. अखेर जिंदाल कंपनीच पाणी बंद करून प्रथम ग्रामस्थांना टँकरने पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

तालुक्यातील बावनदी आणि निवळी गावात पाणीटंचाई जाणवत आहे. येथील सुतारवाडी, बाईतवाडी यासह बावनदी परिसरातील लोकांनी याविषयी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले होते. या परिसरातील 4 विहिरीनी तळ गाठला आहे. पाणी पाणी करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर आज म्हाडा अध्यक्ष सामंत यांनी बावनदी येथील धरणावर धडक दिली. 

एमआयडीसीकडून नियम धाब्याबर बसवत ग्रामस्थांना तहानलेले ठेऊन जिंदाल कंपनीला पुरवले जात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. परिस्थिती लक्षात आल्यानंतर आमदार सामंत यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. निसर्गामुळे लोकांवर पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे आणि एमआयडीसी कंपनीला कसे पाणी पुरवले जाते. पाणी आधी लोकांना दिले पाहिजे. ताबडतोब जिंदलचे पाणी बंद करा आणि लोकांना पाणी द्या. यावर नरमलेल्या अधिकाऱ्यांनी तत्काळ पाणी बंद करण्याचे आदेश दिले.

निवळी येथील टाकीवरून टँकरने पाणी पुरवठा करण्याची तयारी जिंदाल कंपनी आणि एमआयडीसीने दर्शवली आहे. दिवसाला 2 टँकर या परिसरात दिले जाणार आहेत. ही व्यवस्था पाऊस पडेपर्यंत केली जाईल, असे आश्वासन कंपनी प्रतिनिधी आणि एमआयडीसी अधिकाऱ्यांनी दिले. त्यावरून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

निवळी गावात धरण बांधून पाणी जिंदाल कम्पनीला पाणी दिले जाते. शासनाच्या निर्णयाप्रमाणे पहिले पाणी ग्रामस्थांना या प्रमाणे जिंदाल आणि एमयडीसीला सूचना केल्या आहेत. हक्काचं पाणी ग्रामस्थांना दिल नाही आणि उद्रेक झाला तर यास शासन जबाबदार राहील. 

- उदय सामंत, म्हाडा अध्यक्ष

येथील लोकांना पाणी कमी पडतंय. ग्रामस्थांना पाणी टँकरने दिले जाईल. धरणात पाणी नाही त्यासाठी नदीच्या प्रवाहातील पाणी उपसून आणले जाणार आहे. तोपर्यंत जिंदलचे पाणी बंद ठेवले जाईल.
- प्रल्हाद करावडे,
कार्यकारी अभियंता, एमआयडीसी

एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता करावडे, वि. पी. शेलार, बी. एन. पाटील, जिंदलचे पेंडंन्न रामायणम, विपिन दहिवसे, जिल्हा परिषद सदस्य परशुराम कदम, पंचायत समिती सदस्य साक्षी रावणग, सरपंच वेदिक रावणग उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com