पाली खोपोली मार्गावर रस्ता गेला वाहून

अमित गवळे
सोमवार, 25 जून 2018

पाणी साठले म्हणून जेसीबीने खणून पाणी काढत असतांना माती व रस्ता वाहून गेला. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहने अडकून पडली.

पाली - सुधागड तालुक्यात रविवारी (ता. 24) रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पाली खोपोली मार्गावर खुरावले फाटा येथील रास्ता सोमवारी (ता. 25) वाहून गेला.
      
या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. येथील एका मोरीच काम अपूर्ण होते. तेथे पाणी साठले म्हणून जेसीबीने खणून पाणी काढत असतांना माती व रस्ता वाहून गेला. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहने अडकून पडली. खुरावले ते पेडली गाव आणि खुरावले ते वावे गावापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. परिणामी वाकण व पाली मार्गे खोपोलीकडे जाणारी वाहने उन्हेरे-वाघोशी मार्गे वळविण्यात आली. तर खोपोली मार्गे पालीकडे येणारी वाहने वाघोशी-उन्हेरे मार्गे वळविण्यात आली. हा रस्ता दुरुस्तीचे काम ताबडतोब सुरू करण्यात आले. नवी मोरी टाकण्याचे काम दुपारपर्यंत सुरू होते. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पाली पोलिस घटनास्थळी उपस्थित होते.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

 

Web Title: water overflow on pali khopoli road