#WaterScarcity वैभववाडीत रात्र रात्र जागताहेत घोटभर पाण्यासाठी

#WaterScarcity वैभववाडीत रात्र रात्र जागताहेत घोटभर पाण्यासाठी

वैभववाडी - विहीरी आटल्या आहेत, मोजक्‍या विंधन विहीरींना थोडेफार पाणी आहे; परंतु ते सुध्दा पिण्यायोग्य नाही. एका विहीरीत तासातासाने पाच दहा हंडे पाणी साचतेय; परंतु ते मिळविण्यासाठी अक्षरक्षः रात्र रात्र जागवायला लागत आहे. गुराढोरांच्या पाण्याचे देखील हाल होत आहेत. आखवणे भोम मधील ही भीषण स्थिती ढिम्म प्रशासनाच्या नजरेस मात्र अद्याप आलेले नाही.

अरूणा प्रकल्पांच्या बुडीत क्षेत्रातील आखवणे, भोम आणि नागपवाडी या गावात सध्या विदारक चित्र पाहायला मिळत आहे. गावातील चार पैकी तीन विहीरी पुर्णपणे आटल्या आहे. नागपवाडी येथील एका विहीरीत तासातासाच्या फरकाने पाच दहा हंडे पाणी साचतेय; परंतु ते भरण्यासाठी त्या वाडीतील महिलांना अक्षरक्षः रात्र रात्र जागे राहायला लागत आहे.

या वाडीतील लोकांना या विहीरीचा आधार वगळता अन्य पाण्याचा दुसरा कोणताही स्त्रोत नाही. यापेक्षा भयावह परिस्थिती आखवणे धनगरवस्तीत आहे. येथील दोनही विहीरी महिनाभरापुर्वीच आटल्या आहेत. वाडीत एकच विंधनविहीर आहे; मात्र या विंधनविहीरीचे पाणी पिण्यायोग्य नाही.पुरेसा पाणीसाठा होत नसल्यामुळे त्यामधुन गढुळ पाणी येत आहे. या वाडीत सुमारे 30 ते 40 वस्ती आहे. याशिवाय 70 ते 80 गुरे आहेत. या सर्वाना या पाण्याशिवाय पर्याय नाही. गढुळ पाणी पिवुनच त्यांना आपली तहान भागवावी लागत आहे. गुरववाडी, बौध्दवाडी या सर्वच वाड्यांमधील पाण्याची स्थिती आहे.

बुडीत क्षेत्रात नवीन काम करता येत नाही असा शासनाचा निर्णय आहे; परंतु धनगरवाडी बुडीत क्षेत्रात येत नाही तेथे देखील पिण्याची पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. एक विंधन विहीर मंजुर आहे; परंतु ती खोदण्यासाठी प्रशासनाला मुहुर्त मिळत नाही.

अरूणा प्रकल्प व्यवस्थांपनाकडे एक सारखा तगादा लावला तर तीन चार दिवसांने एखादा टॅंकर पाण्याचा पुरविला जातो; मात्र हे पाणी देखील पुरेसे नसते. गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे; परंतु प्रशासनाने याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

प्रकल्पग्रस्तच तहानलेले
अरूणा प्रकल्पांसाठी आखवणे,भोम आणि नागपवाडी यांनी आपली शेकडो एकर शेतजमीनीवर पाणी सोडले. या प्रकल्पांमुळे भविष्यात 5 हजार 310 हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे; परंतु लोकांच्या भवितव्याचा विचार करणारे प्रकल्पग्रस्तच सध्या तहानलेले आहे.

रात्र रात्र जागुन भरतायत पाणी
आखवणे गुरववाडी येथील विहीरीत तासाभराच्या फरकाने आठ दहा हंडे पाणी साचते. हे पाणी मिळावे याकरीता वाडीतील लोक रात्री एक दोन वाजेपर्यत वाट पाहत असतात. तर काही लोक पहाटे चार वाजता उठुन पाणी भरतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com