खेडमध्ये वाढल्या टंचाईच्या झळा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

नदीपात्रात खडखडाट - दहा गावांसाठी दोन टॅंकर

खेड - तालुक्‍याच्या टंचाई आराखड्यात ३३ गावे ५५ वाड्यांचा समावेश आहे. मात्र गाव-वाड्यांची संख्या वाढण्याची चिन्हे आहेत. टंचाईग्रस्त वाड्यांना पाणीटंचाईची झळ पोचू नये यासाठी पंचायत समितीत कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. गेल्यावर्षी किमान विशेष कक्ष उभारण्यात आला होता. त्यामुळे टंचाईग्रस्तांचे खेटे तरी वाचले होते. दहा गावांसाठी अवघे दोन टॅंकर आहेत.

नदीपात्रात खडखडाट - दहा गावांसाठी दोन टॅंकर

खेड - तालुक्‍याच्या टंचाई आराखड्यात ३३ गावे ५५ वाड्यांचा समावेश आहे. मात्र गाव-वाड्यांची संख्या वाढण्याची चिन्हे आहेत. टंचाईग्रस्त वाड्यांना पाणीटंचाईची झळ पोचू नये यासाठी पंचायत समितीत कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. गेल्यावर्षी किमान विशेष कक्ष उभारण्यात आला होता. त्यामुळे टंचाईग्रस्तांचे खेटे तरी वाचले होते. दहा गावांसाठी अवघे दोन टॅंकर आहेत.

वर्षानुवर्षे तालुक्‍यात सर्वाधिक टंचाईग्रस्त वाड्यांची नोंद व पहिला टॅंकर खेडमध्ये धावतो. चिंचवली-ढेबेवाडी येथे २१ मार्चला पहिला टॅंकर धावला. यामध्ये खवटी-खालची व वरची धनगरवाडी, तुळशी कुबजई या ठिकाणी जानेवारी महिन्याच्या शेवटी पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागते. दिवसागणिक उपलब्ध पाण्याचे स्रोत आटत चालल्याने तहानलेल्या ग्रामस्थांची सारी मदार आता टॅंकरवर अवलंबून आहे. खवटी-वरची व खालची धनगरवाडी, शिंगरी-धनगरवाडी, आंबवली भिंगारा, बौद्धवाडी, संगलट -सुतारवाडी, कुणबीवाडी, दवंडेवाडी, बौद्धवाडी, मोहल्ला, बेलदारवाडी, किंजळेतर्फे नातू येथून टॅंकरसाठी मागणी झाली.

टंचाईग्रस्त गाव-वाड्या मध्ये खवटी -वरची धनगरवाडी, खालची धनगरवाडी, गावडेवाडी, तुळशी खुर्द - कुबजई, तुळशी बुद्रुक, देवाचा डोंगर, आंबवली भिंगारा -धनगरवाडी, म्हाळुंगे -धनगरवाडी, चिंचवली-ढेबेवाडी, शिरवली -दंडवाडी, निळवणे -कातळवाडी, सवणस -मुळगाव, तळे -पालांडेवाडी, धनगरवाडी, म्हसोबावाडी, देवसडे- सावंतवाडी, मधलीवाडी, कदमवाडी, वैरागवाडी, जाधववाडी, बौद्धवाडी, खोपी- रामजीवाडी, जांभुळवाडी, तिसंगी -धनगरवाडी नं.१, नं.२, कुळवंडी -शिंदेवाडी, मोरवंडे -मधलीवाडी, सवेणी -धनगरवाडी, दयाळ -भडवळकरवाडी, बुरटेवाडी, गौळवाडी, जोशीवाडी यांचा समावेश आहे. याशिवाय वाडीजैतापूर -धनगरवाडी, मांडवे -हिंदळीचीवाडी, कोंडवाडी, विठ्ठलवाडी, रामचंद्रवाडी, पोयनार -पाटीलवाडी, अलाटेवाडी, आंबये -बुरूमवाडी, मांजरेकरवाडी, घेरापालगड- किल्लेमाची, जांभुळवाडी, मोरेवाडी, जांभुळवाडी, नांदगाव -जाखलवाडी, कोतवली- टेमभोईवाडी, कशेडी बंगला- थापेवाडी, बोरटोक, चाटव -धनगरवाडी आदी गाव वाड्यांनाही पाणीटंचाई भेडसावण्याची दाट शक्‍यता आहे. टंचाई आराखड्यात धनगरवाड्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश करण्यात आला आहे.

खेड जेसीसतर्फे टॅंकरची सोय

खेड जेसीज्‌च्या वतीने तळे-जांभूळवाडी येथे टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात आला. त्यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला. पाण्यापासून वंचित गाव-वाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय जेसी पदाधिकाऱ्यांनी घेतला. त्यासाठी स्वतःच्या पदराला खार लावली. जेसीज्‌चे अध्यक्ष अमोल क्षीरसागर, डॉ. विक्रांत पाटील, शैलेश मेहता, आनंद कोळेकर, नबील पोत्रिक यांनी यामध्ये पुढाकार घेतला.

Web Title: water shortage in khed