रसायनी: अनियमित पाणी पुरवठ्यामुळे प्रवाशांची गैरसोय

लक्ष्मण डूबे
सोमवार, 30 एप्रिल 2018

कोकण रेल्वेच्या मार्गावरील आपटा रेल्वे स्थानकात रसायनीतील तसेच पाताळगंगा आणि अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील, क्षेत्रा बाहेरील कारखान्यांतील कामगार तसेच रसायनी पाताळगंगा परीसरातील ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावांतील नागरिक रोहा आणि पनवेल, मुंबई कडे जाताना चढ ऊतार करतात. 

रसायनी (रायगड) : रसायनीतील आपटा रेल्वे स्थानकात अनियमित पाणी पुरवठ्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रवाशी रेल्वेच्या विरोधात नाराजी व्यक्त करत आहे. 

कोकण रेल्वेच्या मार्गावरील आपटा रेल्वे स्थानकात रसायनीतील तसेच पाताळगंगा आणि अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील, क्षेत्रा बाहेरील कारखान्यांतील कामगार तसेच रसायनी पाताळगंगा परीसरातील ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावांतील नागरिक रोहा आणि पनवेल, मुंबई कडे जाताना चढ ऊतार करतात. 

रेल्वे स्थानकात पिण्यासाठीच्या आणि स्वच्छता गृहात नळांना ब-याचदा चार चार दिवस पाणी नसते असे  म्हात्रे आणि इतर प्रवाशांची तक्रार आहे. तर स्वच्छता गृहात साफसफाई वेळेवर केली जात नाही. दुर्गधीमुळे नाक मुठीत धरणु विधी उरका लागतो. असे सांगण्यात आले.  दरम्यान प्रवाशांची गैरसोय होत असल्याने प्रवाशी नाराजी व्यक्त करत आहे. पिण्यासाठी आणि स्वच्छता गृहात कायम स्वरूपी पाण्याची  सुविधा आसावी आशी मागणी करण्यात आली आहे. रेल्वे स्थानकात पाणी पुरवठा अनियमित होत असल्याने  प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था केली आहे. असे स्टेशन मास्तरने सांगितले. 

Web Title: water supply in Rasayani