‘पाणीपुरवठा-वाहन’ समन्वय हवा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

चिपळूण - चिपळूण पालिकेच्या वाहन विभागाची जबाबदारी राजेंद्र जाधव यांच्याकडे देण्यात आली. यानिमित्त नगराध्यक्ष सुरेखा खेराडे यांच्या हस्ते जाधव यांचा सत्कार करण्यात आला. वाहन विभागाची प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना नगराध्यक्षांनी श्री. जाधव यांना केल्या आहेत.

पाण्याच्या मागणीनंतर वाहन विभागाने तत्परता दाखवली, तर तक्रारी येणार नाहीत. तसेच कोणासही मोफत वाहन देऊ नये, यावर कटाक्ष ठेवण्यास सांगण्यात आले.

वाहन विभागप्रमुख दादा खापरे सेवानिवृत्त झाल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर श्री. जाधव यांची नेमणूक करण्यात आली. आज त्यांनी नगराध्यक्षांची भेट घेतली. नगराध्यक्षांनी त्यांना पुढील कामाबाबत सूचना केली. कामकाजात पाणीपुरवठा विभाग आणि वाहन विभागात समन्वय राहिला पाहिजे. ज्या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो त्या भागात पालिकेडून पाणी पुरवण्याची वेळ आल्यास तातडीने कार्यवाही झाली, तर लोकांच्या तक्रारी येणार नाहीत. पाणी मिळत नाही अशी तक्रार घेऊन लोक पालिकेत येणार नाहीत. त्यामुळे वाहन विभाग आणि पाणी विभागाची जबाबदारी मोठी आहे. पालिकेची वाहने कोणालाही मोफत देऊ नका, पाण्यासाठी वाहन देताना पैसे भरल्यानंतरच वाहन द्या. धार्मिक कामासाठी पाणी देताना कुणाचीही अडवणूक करू नका. वाहन विभागात किती गाड्या आहेत, महिन्याला डिझेल किती लागते याचा लेखी अहवाल तयार करा.

वाहन विभागातून पालिकेला उत्पन्न मिळाले पाहिजे, यादृष्टीने कामकाज करा, अशा सूचनांची जत्रीच नगराध्यक्षांनी श्री. जाधव यांच्यापुढे ठेवल्याचे कळते.

राजेंद्र जाधव १९९७ मध्ये पालिकेत लिपिक म्हणून रुजू झाले. जकात नाका, लेखा विभाग, करवसुली विभाग, आरोग्य विभागात त्यांनी काम केले आहे. पालिकेचे रोखपाल, अंतर्गत लेखा परीक्षक, आस्थापन विभागप्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. आस्थापन विभागासह वाहन विभागाचे प्रमुख म्हणून त्यांच्याकडे अतिरिक्त कारभार देण्यात आला आहे. 

याआधी डिझेल घोटाळ्यामुळे पालिकेचा वाहन विभाग वादात सापडला होता. तसेच आरोप-प्रत्यारोपही झाले होते. त्या वादाला राजकीय किनारही होती. या पार्श्‍वभूमीवर नगराध्यक्षांनी जाधव यांना खबरदारी घेण्याच्या दिलेल्या सूचना पालिकेच्या कामकाजाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत.

Web Title: water supply-vehicle coordination