
Unseasonal Rain : अवकाळी, मॉन्सूनपूर्व आणि तब्बल १३ दिवस आधी जिल्ह्यात दाखल झालेल्या मॉन्सून पावसाने जिल्ह्यातील कलिंगड उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे. पर्यटन हंगाम आणि मुंबईकरांची होणारी गर्दी यामुळे चांगला दर मिळेल, या आशेने पिकविलेले शेकडो टन कलिंगड शेतातच कुजले. एक हजार टनांपेक्षा अधिक कलिंगड मातीमोल झाल्यामुळे उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे. कृषी विभागाकडून प्राप्त झालेली नुकसानीची आकडेवारी पाहता या नुकसानीचे साधे पंचनामेही झाले नसल्याचे स्पष्ट होत आहे.