रायगडाची वाट धोक्याची,पाच वर्षात बारा बळी

सुनील पाटकर
सोमवार, 11 जून 2018

रायगड - 6 जूनला शिवराज्याभिषेकदिना निमित्त गडावर आलेल्या एका शिवप्रेमीचा अंगावर दगड कोसळून मृत्यु झाल्याने रायगडावर येणा-या शिवप्रेमींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

रायगड - 6 जूनला शिवराज्याभिषेकदिना निमित्त गडावर आलेल्या एका शिवप्रेमीचा अंगावर दगड कोसळून मृत्यु झाल्याने रायगडावर येणा-या शिवप्रेमींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

गडावर जाणा-या अरुंद पाऊलवाटा, पाय-यांचा मार्ग व कड्यावरून सुटणारे दगड यामुळे गडाची वाट खडतर होत चालली आहे.त्यातच रायगडावर विविध कार्यक्रमांमुळे होणारी गर्दी यामुळे हा धोका वाढत चालला आहे. काळानुसार येथील कडेकपारीची झीज,पाय-यांची दुरावस्था,संरक्षक कठडे तसेच दगड कोसळत आहेत.पाऊलवाटाही दिवसेंदिवस अरूंद होत आहेत. गडावर जाण्यासाठी सुमारे दिड हजार पाय-या व पाऊल वाटेचा रस्ता आहे. रायगडावर सर्वच ठिकाणी धोकादायक जागी संरक्षक भिंती व लोखंडी कठडे नाहीत.रायगड संवर्धनांतर्गत हे काम केले जाणार असले तरीही काही मार्ग खडतरच राहणार आहेत. कार्यक्रमांना गडावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने रोप वे ची सुविधा अपूरी पडते व पर्यटक गडावर पायी जातात. याशिवाय शाळा ,महाविद्यालयाच्या सहली व इतर पर्यटकही गड पायी चढतात. परंतु आता रायगडची ही स्वारी जीवघेणी ठरू लागली आहे.गेल्या काही वर्षात सुमारे 12 पर्यटकांना वेगवेगळ्या कारणांमुळे रायगडवर मरण पत्करावे लागले आहे. 

रायगडावरील घटना 

  • 6 जून 2018 -  दगड अंगावर आल्याने तसेच चेंगराचेगरीत एक शिवप्रेमी ठार 7 जखमी
  • 25 जून 2016 - दगड अंगावर आल्याने पर्यटकाचा मृत्यू
  • 3 जानेवारी 2016 - दापोली येथील एक विद्यार्थीनीचा  मृत्यू
  • 20 जूलै 2014 कांजूरमार्ग येथील रिक्षाचालकाचा मृत्यू
  • 2013 - 2 शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू. 
  • 2012 - राजापूर येथील महाविद्यालयीन तरूणाचा मृत्यू
  • 2012 - दापोली येथील शिक्षकाचा मृत्यू

आरोग्य केंद्र व पोलिस दूरक्षेत्र नावापुरते
रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र नावापुरते असल्याने येथे तातडीने उपचार मिळणे कठिण असते.पाचाड येथे पोलिस दूरक्षेत्रही आहे परंतु त्याची केवळ इमारत आहे.कार्यक्रम वगळता अन्य दिवशी ते बंदच असते.

पुरातत्व विभागाच्या ताब्यात जी ठिकाणे आहेत तेथे सुरक्षेच्या दृष्टिने प्रयत्न केले जातील,परंतु दरड कोसळणा-या जागा वनविभागाच्या ताब्यात आहेत.येथे वनविभाग किंवा जिल्हा प्रशासन काही उफाययोजना करणार असेल तर त्याला पुरातत्व विभाग आडकाठी न करता सहकार्य करेल - बिपिनचंद्र नेगी (अधिक्षक,भारतीय पुरातत्व विभाग)

Web Title: way to Raigad is dangerous, twelve dead in five years