सुधागडातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ पडसरे येथील पुल धोकादायक

अमित गवळे
गुरुवार, 3 मे 2018

पाली - पावसाळी पर्यनासाठी प्रसिद्ध असलेल्या सुधागड तालुक्यातील पडसरे गावाला जोडणारा पुल मोडकळीस आला असून धोकादायक अवस्थेत आहे. हा पुल पडसरे गावाला सुधागड तालुक्यातील सर्व गावांशी जोडतो. पडसरे पुलाची पाहणी नुकतीच रायगड जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी केली.

पाली - पावसाळी पर्यनासाठी प्रसिद्ध असलेल्या सुधागड तालुक्यातील पडसरे गावाला जोडणारा पुल मोडकळीस आला असून धोकादायक अवस्थेत आहे. हा पुल पडसरे गावाला सुधागड तालुक्यातील सर्व गावांशी जोडतो. पडसरे पुलाची पाहणी नुकतीच रायगड जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी केली.

या पुलाचे संरक्षण कठडे तुटलेल्या अवस्थेत अाहेत. संरक्षक कठड्याच्या लोखंडी सळया बाहेर निघाल्या असुन वाहने पुलाखाली कोसळून अपघाताची शक्यता आहे. या पडसरे पुलाची व येथील प्रसीध्द अशा धबधब्याची रायगड जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी पाहणी केली. त्यांनी पुल दुरुस्तीबाबत सबंधीत विभागाला तत्काळ सुचना दिल्या जातील असे सांगितले. या पुलाचा वापर पडसरे, लोळगेवाडी, एकलघर,  महागाव, देउळवाडी, कवेलेवाडी,कोंडक आदिवासीवाडी, भोप्याचीवाडी, गोमाशी आदिवासीवाडी आदी गावातील नागरीक करतात. निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येणारे पर्यटक देखील या पुलाचाच करतात. पुला खालुनच धबधब्याचे पांढरे खळखळणारे पाणी वाहते. महागाव पडसरे मार्गावर सतत वाहनांची वर्दळ सुरु असते. पुलावरुन नागरीकांची देखिल रेलचल सुरु असते. पडसरे आदिवासी आश्रमशाळेत देखील मोठ्या संख्येने विद्यार्थी येत असतात. त्यामुळे येथील रस्ते व नदी पुल सुस्थीतीत व सुरक्षित असणे गरजेचे आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेवून भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने पडसरे पुलाची तत्काळ दुरुस्ती करावी. व प्रवाशी जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्तांसह पर्यटकांनी केली आहे.

पर्यटन विकासाला देणार चालना
येथील डोंगराळ भागातील निसर्गरम्य व मनमोहक अशा पडसरे येथील धबधबा पर्यटकांचे मुख्य आकर्षण मानला जातो. हे ठिकाण येथिल पर्यटन स्थळ अधिक विकसीत करुन स्थानिकांना रोजगार निर्माण करण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न केले जातील असे जिल्हाधिकारी डॉ. सुर्यवंशी यांनी अाश्वासन दिले.

Web Title: The well-known tourist spot in Sudhagad bridge is not in good condition