पश्चिम विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत आयुष कुलकर्णी अव्वल

अमित गवळे
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

पाली (वार्ताहर) - नुकत्याच काणकोणम (गोवा) येथे जवाहर नवोदय विद्यालयाच्या महाराष्ट्र, गुजरात, व गोवा या तीन राज्यांच्या पश्चिम विभागीय बुध्दीबळ स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत १४ वर्ष वयोगटात जिल्ह्यातील नवोदय विद्यालयात शिकणारा पालीतील आयुष मल्हारी कुलकर्णी या विदयार्थ्याने प्रथम क्रमांक पटकाविला. आणि त्याची राष्ट्रीय बुध्दीबळ स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

आयुषला पढील महिन्यांनी केरळ येथे होणार्‍या राष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी प्राप्त झाली आहे. बुध्दीबळ हा जगातील सर्वात प्रसिध्द असलेल्या बैठ्या खेळापैकी एक खेळ आहे. बुध्दिबळात कला आणि शास्त्र या दोघांचा मिलाप झालेला आहे. या खेळात आयुषने वयाच्या आठव्या वर्षापासून तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धेत चमकदार कामगीरी करुन उज्वल यश संपादन केले आहे. त्याची क्रिडा क्षेत्रातील वाटचाल अधिक उजळत आहे. या राष्ट्रीय स्पर्धेसाठी आयूष अधिक मेहनत घेवून सराव करत आहे. आणि या स्पर्धेत देखील बाजी मारणार असल्याचा विश्वास आयुष कुलकर्णी याने व्यक्त केला आहे. आयुष कुलकर्णीच्या या यशाने रायगडच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्यामुळे त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Web Title: In the Western Divisional Chess Championship, Aishush Kulkarni is the top player