शिंदे अंबेरीत व्हेल माशाची सहा कोटींची उलटी जप्त

तस्करीच्या संशयावरून चौघे ताब्यात, वन विभाग व पोलिसांची कारवाई
Sperm whale vomiting
Sperm whale vomitingSakal

चिपळूण : संगमेश्वर तालुक्यातील मौजे शिंदे अंबेरी येथे व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीबाबत चौघांना ताब्यात घेण्यात आले. अज्ञात व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार सापळा रचून रत्नागिरी वन विभाग व स्थानिक पोलिस विभाग यांनी संयुक्तरित्या कारवाई केली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या उलटीची किंमत सहा कोटी आहे.प्रसाद प्रवीण मयेकर (वय ३२, रा. भाटयेमिया, ता. रत्नागिरी) नरेंद्र वसंत खाडे (५४, रा. काखरतळे, ता. महाड, जि. रायगड) सत्यभामा राजू पवार (४५, रा. दत्तनगर, माणगाव, ता. महाड), अजय राजेंद्र काणेकर (३६, रा. असगोली, ता. गुहागर) अशी तीन संशयितांची नावे आहेत. संशयितांकडून व्हेल मासा उल्टी (Ambergris) ६.२ किलो व मोटार (एमएच ०८- एएन- ४०३३) जप्त करण्यात आले आहे. संशयितांवर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अन्वये परिक्षेत्र वन अधिकारी, चिपळूण यांनी गुन्हा दाखल केला आहे.

व्हेल माशाची उलटी म्हणजे एक दगडासारखा पदार्थ असतो. त्याला अॅम्बरग्रीस असे म्हणतात. व्हेल माशाने तो तोंडातून बाहेर फेकला की तो वाहत किनाऱ्यावर येतो. या उलटीतून सुगंधी द्रव्यांसाठी (सुगंधी अत्तर, बॉडी स्प्रे आदी) मोठ्या प्रमाणात मागणी असते. जागतिक बाजारपेठेत त्याला मोठी किंमत मिळते. त्याचा पांढरा पिवळसर तपकिरी रंग आहे. या दगडासारख्या गोळ्याला कस्तुरीसारखा गोडसर वास असतो. त्यामुळे त्याचा वापर उच्च प्रतीच्या अत्तराच्या निर्मितीसाठी केला जातो.व्हेल माशाच्या पित्ताशयातून विविध प्रकारची द्रव्ये त्याच्या आतडयामध्ये जातात आणि तेथे अॅम्बरग्रीसची निर्मिती होत असावी असे समजले जाते.

या पदार्थाची निर्मिती होण्यासाठी अनेक वर्षे लागतात. दक्षिण आफ्रिका, ब्राझील, मादामास्कर, मालदीव, भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, बहामा या देशांच्या किनाऱ्यावर हे सुगंधी गोळे सापडले आहेत. या कारवाईत परिक्षेत्र वन अधिकारी राजश्री किर, वनपाल आखाडे, वनपाल गुहागर स. वि. परशेटये, सु. रा. उपरे, सहाय्यक पोलीस फौजदार प्र.अ.गमरे, हेड कॉन्टेबल मोहिते, वनरक्षक कोळकेवाडी शिंदे, वनरक्षक रामपूर, नांदगाव, गुढे, तसेच वि.द .झाडे, कृ.द. इरमले, अरविंद मांडवकर, अ.अ.ढाकणे, सं.बा. दुंडगे यांनी सहभाग घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com