warts
wartsgoogle

Warts : पेशींची अनैसर्गिक वृद्धी आरोग्यासाठी घातक! त्वचेवरील चामखीळ अन् होमिओपॅथिक उपचार

चामखीळ ही समस्या तशी त्रासदायक नसते. क्वचित प्रसंगी त्याला खाज येणे, वेदना होणे आणि रक्तस्राव होणे असेही असू शकते.
Published on

Warts : शरीरामध्ये अनेक प्रकारे पेशींची अनैसर्गिक वाढ होताना दिसते. होमिओपॅथिक शास्त्र या वाढीच्या मुळाजवळ असणाऱ्या मूळ दोषाचा संबंध या अनैसर्गिक पेशीवृद्धींसोबत लावून त्या मुळ दोषावर नेमकेपणाने उपचार करत असते. पेशींची अनैसर्गिक वृद्धी मानवी शरीरामध्ये कॅन्सर, फायब्रॉईड, सिस्ट, चरबीच्या गाठी, नाकामध्ये वाढणारे मांस, हाताच्या व पायाच्या तळव्यावर येणारी कुरूपे, चामखीळ इत्यादी अनेक प्रकारे दिसून येत असते. आजच्या लेखामध्ये आपण चामखीळ याबाबत विवेचन करू.

चामखीळ ही समस्या तशी त्रासदायक नसते. क्वचित प्रसंगी त्याला खाज येणे, वेदना होणे आणि रक्तस्राव होणे असेही असू शकते. चामखीळ या समस्येमागे सायकोसिस व सिफिलिस (हे होमिओपॅथी शास्त्रातील तीन मुळदोषांपैकी दोन मूळ दोष आहेत.) या नावाचा मूळ दोष बहुतांशी असतो कधी सिफिलिससुद्धा याचे मूळ कारण असू शकते. या मूळ दोषांमध्ये तुलनात्मक खूप फरक आहे. होमिओपॅथिक शास्त्राद्वारे निदान करताना सर्व लक्षणांसोबत मानसिक लक्षणे अभ्यासणे ही महत्वाचे ठरते.

चामखीळाबाबत विचार करताना शरीराच्या कोणत्या भागावर चामखीळ आलेली आहे, त्यांचा आकार कसा आहे उदाहरणार्थ फ्लॉवरच्या गड्ड्याप्रमाणे मुळाजवळ बारीक आणि वरील भाग फुललेला मोठा, चामखीळ टोकदार आहे का? चामखीळाचा रंग कसा आहे? उदाहरणार्थ, काही चामखीळ लालबुंद असतात, काही काळी असतात तर काही त्वचेपेक्षा जराशी जास्त माखेरी रंगाचे असतात. काही चामखीळ स्पर्शात मुलायम जाणवतात तर काही खरखरीत जाणवतात. काही चामखीळ स्पर्श केले असता ती अतिशय वेदनादायी असतात.

warts
Health Care: प्रत्येक प्रकारच्या कॅन्सरला जबाबदार आहेत हे पदार्थ, जाणून घ्या


होमिओपॅथिक शास्त्राच्या आधारे चामखीळांसारख्या व्याधींवर उपचार करताना खूप निराळा दृष्टिकोन आहे. केवळ चामखीळ कापणे किंवा जाळणे असे तात्पुरते उपचार होमिओपॅथीला मान्य नाही. कारण, कापले किंवा जाळल्यानंतर चामखीळ दुप्पट वेगाने उफाळून येताना दिसतात. त्यामुळे त्यामागील असणारा मूळ दोष नीट समजावून घेऊन त्यासोबत असणारी अन्य लक्षणे यांचा अभ्यास करून औषधयोजना करणे गरजेचे आहे. सर्वसामान्य लोकांना आश्चर्य वाटावे अशी लक्षणे चामखीळासोबत प्रकर्षाने दिसून येतात.

उदाहरणार्थ, होमिओपॅथीमध्ये एक औषध असे आहे की, ज्यामध्ये मानेभोवती चामखीळ असतात आणि त्या रुग्णाला हवेत उडण्याचा भास होत असतो किंवा उंचावरून खोल दरीत खाली पडल्याचा भास होतो. अन्य एक औषध असे आहे, मानेभोवती चामखीळ असणाऱ्या रुग्णाच्या लघवीला घोड्याच्या मूत्राप्रमाणे उग्र दर्प येत असतो. या बाबी अन्य शास्त्रांना अनाकलनीय आहेत; परंतु होमिओपॅथिक औषधयोजना करताना या बाबींचा थेट संबंध औषध निवडीसाठी होतो.

warts
Health Alert : कपाळावर ही लक्षणे दिसताच लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा, नाहीतर..

चामखीळासारख्या बऱ्याचअंशी क्लेशकारक नसणाऱ्या परंतु सौंदर्याचा विचार करता कमी-अधिक प्रमाणामध्ये विद्रुपीकरण जाणवणाऱ्या व्याधींमध्ये दोन विचारप्रवाह पाहावयास मिळतात. पहिला या व्याधीकडे दुर्लक्ष केले जाते. जाऊ दे, आपल्याला काही त्रास नाही ना असा एक सामान्य विचार असतो तर तरुण किंवा स्त्रियांमध्ये सौंदर्याचा विचार करता हे रोगचिन्ह क्लेशकारक ठरत असते; परंतु होमिओपॅथी शास्त्र या दोन्ही पलीकडे जाऊन ही रोग लक्षणे ज्या मूळ दोषापासून निर्माण होतात आणि त्यांचा परिणाम मानवी शरीरामध्ये कालांतराने कशा प्रकारचे संक्रमण करतो यावर विचार करून सामान्य वाटणारे हे चामखीळचे रोगचिन्ह मानवी जीवनातील भविष्यामध्ये येणाऱ्या गंभीर स्वरूपाच्या आजाराचे निर्मूलन करणे या योगे सहज शक्य असते.

सामान्य लोकांना साधी वाटणारी चामखीळ भविष्यामध्ये होणाऱ्या गंभीर अशा अनैसर्गिक पेशीवृद्धींच्या आजाराचे प्राथमिक रोगचिन्ह असते. होमिओपॅथीशास्त्र या रोगचिन्हाचे इथेच समुळ उच्चाटन करून भावी जीवनात येणारी क्लेशकारक गंभीर आणि असाध्य व्याधींपासून मानवी जीवन सुरक्षित करू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com