लोकमान्य टिळकांचे जन्मस्थळ विकसित कधी होणार ?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

पुरातत्व विभागाने वारंवार प्रस्ताव पाठवूनही पैसे नसल्याचे कारण पुढे करत हा प्रस्ताव शासनाने फेटाळला आहे. पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. त्यामुळे ही ऐतिहासिक वास्तू आजही उपेक्षित राहिली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी किंवा जिल्हा प्रशासनाने याबाबत निर्णय घेऊन ते विकसित करावी, अशी मागणी होत आहे.

रत्नागिरी - लोकमान्य टिळक यांच्या जन्मस्थानाची अध्याप उपेक्षा सुरूच आहे. 1 ऑगस्टला पुण्यतिथीनिमित्त टिळकआळी येथील जन्मस्थानाची रंगरंगोटी केली जाते. मात्र हे स्थळ राज्य संरक्षित असूनही मूळ स्वरूपात विकसित करण्यासाठी शासनानेकडे पैसेच नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. 

येथील पुरातत्व विभागाने वारंवार प्रस्ताव पाठवूनही पैसे नसल्याचे कारण पुढे करत हा प्रस्ताव शासनाने फेटाळला आहे. पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. त्यामुळे ही ऐतिहासिक वास्तू आजही उपेक्षित राहिली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी किंवा जिल्हा प्रशासनाने याबाबत निर्णय घेऊन ते विकसित करावी, अशी मागणी होत आहे. टिळक जन्मस्थानाला देश-विदेशातील पर्यटक बारमाही भेटी देतात. मात्र रत्नागिरीचा मानबिंदू असलेल्या या वास्तूची ही वाईट अवस्था पाहून आपसुकच येथील व्यवस्थांचे वाभाडे निघतात वा नाराजी व्यक्त होते. छतावरील जुने मंगलोरी कौले विस्कटली आहेत. अनेक ठिकाणी ती शिल्लक राहिलेली नाहीत, उडालेला रंग, तुटलेला म्युरल हेच येणाऱ्या पर्यटकांना येथे पहायला मिळते. 

हेही वाचा - देवगडची विरोधी बाकाची परंपरा कायम 

दुर्मिळ वस्तूंचे जतन होण्याची गरज

राज्य संरक्षित स्मारक म्हणून टिळक जन्मभूमी पुरातत्त्व खात्याने मूळ रूपात जतन करून ठेवली आहे. त्या काळचे घर जसेच्या तसे जतन करण्यात पुरातत्त्व विभागाने महत्त्वाची भूमिका बजावली . या घरावर पूर्वीचे नळे (कौले) असून आतील भागही जसाच्या तसा जतन केला आहे. आतील भागात असलेल्या मोऱ्या, जुने कोनाडे जतन करण्यात आले आहेत. या घरामध्ये वस्तुसंग्रहालय असून त्यात वंशावळ, दुर्मिळ फोटो, टिळकांचा चष्मा, लेखणी आदी दुर्मिळ वस्तू आता जनत होणे गरजेचे आहे. 

हेही वाचा - कोणी केली मालवण नगराध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी ?

10 कोटीच्या वर निधी मागितला 

लोकमान्य टिळक स्मारकाच्या विकासासाठी दोन वेळा प्रस्ताव पाठविला. मात्र पैसे नसल्याचे कारण पुढे करून तो फेटाळण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांना देखील याबाबत पत्र दिले आहे. त्यामध्ये 10 कोटीच्या वर निधी मागितला आहे. एवढी मोठी रक्कम जिल्हाधिकारी देऊ शकत नाहीत. तात्पुरत्या स्वरुपाच्या दुरूस्तीला टप्प्या-टप्प्याने 5 - 5 लाख देण्याचे त्यांनी मान्य केले आहे, अशी माहिती पुरातत्व विभागाने दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When Will Be Birthplace Of Lokmanya Tilak Development