वाहन चालवताना संवेदनशिलता, नियमावली आणि सुरक्षितता राखा

अमित गवळे
मंगळवार, 24 एप्रिल 2018

पाली (रायगड) : पनवेल येथील अमिटी विद्यापिठाच्या लिबरल आर्ट विभाग आणि युनायटेड मुंबई विभाग या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रस्ते सुरक्षा या विषयावर नुकतीच कार्यशाळा घेण्यात आली. वाहन चालवीत असताना वाहनचालकांत संवेदनशिलता,नियमावली आणि सुरक्षितता राखणेबाबत प्रशिक्षण देणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.

या कार्यशाळेत चर्चासत्र आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून रस्ता सुरक्षितता राखण्याबाबत सहजरित्या व सोप्या पध्दतीने माहिती देण्यात आली. सद्यस्थितीत लोकसंख्येत अफाट वाढ झाली असून वाढत्या औद्योगीकीरणामुळे रस्त्यावरील वाहनांची देखील दुपटीने वाढ झाली आहे.वेगवान व नियमांचे उल्लंघण करणार्‍या वाहनांमुळे अपघातात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. अपघात हा अपघात असतो त्यामुळे अपघात कधी, केव्हा, कसा व कुणाचा होईल याचा नेम नसतो. त्यामुळे प्रत्येकाने रस्ता सुरक्षा बाळगून सुरक्षीतरित्या वाहतूक व प्रवास करणे प्रत्येकाची जबाबदारी असते. 

प्रत्यकाने वैयक्तीक सुरक्षेबरोबर कुटूंबाच्या सुरक्षेच्या दृष्टीने रस्ता सुरक्षिततेवर लक्ष दिले पाहिजे असे मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात आले. या कार्यशाळेत अमेठी विद्यापिठातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला होता.कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी अमेठी विद्यापीठातील प्राध्यापिका मिरा लिमये, प्राध्यापक अमेय महाजन, डॉ.दिपक हवालदार, आणि युनायटेड वे या सामाजिक संस्थेचे श्री गौडफ्री आणि सहकार्‍यांचे महत्वपुर्ण योगदान व सहकार्य लाभले.
 
Web Title: while driving be safe and sensible follow the rules