नारगोली धरणात आढळळा दुर्मिळ अडई पक्षी

नारगोली धरणात आढळळा दुर्मिळ अडई पक्षी

दाभोळ - दापोली शहराला पाणीपुरवठा करणार्‍या नारगोली येथील धरणात अडई अर्थात छोटा मराल नावाचा दुर्मिळ पक्षी आढळून आला. हा पक्षी पाहण्यासाठी अनेक दापोलीकर या धरणाकडे धाव घेत आहेत.

कमलिनी, कुमुदिनी, कमळ अशा पाणवनस्पतींनी बहरलेल्या तळयांवर अडई नावाचे बदक दिसते. हा पक्षी सर्रास पाण्यातून बाहेर आलेल्या किंवा अर्धवट बुडालेल्या वनस्पती नसलेल्या स्वच्छ मोकळ्या पाण्याच्या तळयांवर किंवा मोठया नद्यांवर हा पाणपक्षी दिसत नाही. तसेच हा पक्षी मुख्यतः निशाचर असल्याचे जाणकार सांगतात. मात्र सध्या पाण्यासाठी टंचाई असल्याने पाण्याच्या शोधासाठी अडई दापोलीत दाखल झाला आहे. या पक्षाची फिकट तपकिरी, किरमिजी आणि चेस्टनट रंगाचे हे मध्यम आकाराची बदके सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.

अडई हा पाळीव बदकापेक्षा लहान असून तो सुमारे 42 सेंमी एवढा लांब असल्याचे दिसते. धान्य, पाणवनस्पतींचे कोंब, लहान मासे आणि गोगलगायी हे त्यांचे मुख्य खाद्य असून तो तसा दुर्मिळ समजला जातो. सध्या दापोली शहराला पाणीपुरवठा करणार्‍या नारगोली येथील धरणातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. यामुळे येथे सध्या वर्दळ आहे. यातच हा दुर्मिळ पक्षी दिसू लागल्याने तो सार्‍यांचेच लक्ष वेधून घेत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com