जंगली वनस्पतींची माहिती देणारी जैवविविधतता दिनदर्शिका.

वर्षाच्या 365 दिवसांवर कोकणातील 365 जंगली वनस्पतींची ओळख करून माहिती त्यांनी प्रकाशित केली आहे.
जंगली वनस्पतींची माहिती देणारी जैवविविधतता दिनदर्शिका.

राजापूर : दरवर्षी छापण्यात येणार्‍या दिनदर्शिकांमध्ये विविधांगी प्रकारच्या दिनदर्शिका प्रकाशित करण्याचा नवा ‘ट्रेंड’ आलेला पहायला मिळतो. अशा स्थितीमध्ये तालुक्यातील अणसुरे येथील हर्षद तुळपुळे या तरूणाने कोकण आणि सह्याद्रीच्या कुशीमध्ये दडलेल्या जैवविविधतता आणि जंगली वनसस्पतींची माहिती देणारी 2022 ची ’जैवविविधता दिनदर्शिका’ तयार केली आहे. यामध्ये वर्षाच्या 365 दिवसांवर कोकणातील 365 जंगली वनस्पतींची ओळख करून माहिती त्यांनी प्रकाशित केली आहे. या दिनदर्शिकेच्या माध्यमातून कोकणासह सह्याद्री परिसराला उपजत लाभलेलं निसर्गसौंदर्य आणि जैवविविधततेची माहिती घराघरात पोहचण्याला, जपणूक होण्याला आणि ती त्याद्वारे जगाच्या नकाशावर पुन्हा एकदा येण्याला अधिक मदत होणार आहे.

वर्ष संपत आलं, की नव्या वर्षाच्या दिनदर्शिकेचे अर्थात कॅलेंडरचे सार्‍यांना वेध लागतात. केवळ तारीख, वार, वर्ष, तिथी एवढंच प्रसिद्ध करणारी कॅलेंडर्स आता जवळपास इतिहासजमा झाली आहेत. त्याच्यासोबतच खाद्यसंस्कृतीपासून निसर्गसौंदर्यापर्यंत आणि फॅशन मॉडेल्सपासून गड-किल्ल्यांपर्यंत, एवढेच नव्हे तर गावोगावची सविस्तर माहिती देणारी कॅलेंडर्स प्रकाशित करण्याचा गेल्या काही वर्षामध्ये नवा ट्रेंड आला आहे. पर्यावरणाविषयी सजग असलेल्या तालुक्यातील श्री. तुळपुळे ह्या तरुणाने कोकणातली जैवविविधतता विशेष जंगली वनस्पतींवर आधारीत कॅलेंडर प्रकाशित करून कॅलेंडर प्रकशनामध्ये नवा ट्रेंड आणला आहे. त्याच्या या नव्या अन् अनोख्या उपक्रमाचे सार्‍यांनी स्वागत केले आहे.

हर्षद तुळपुळे यांनी तयार केलल्या दिनदर्शिकेसाठी ‘जंगली वनस्पती’ ही थीम वापरण्यात आली आहे. त्यामध्ये विशेषतः कोकण आणि सह्याद्रीत आढळणार्‍या एका जंगली वनस्पतीचा फोटो दिनदर्शिकेतल्या प्रत्येक तारखेवर आणि त्यासोबत वनस्पतींचं मराठी आणि वनस्पतीशास्त्रीय नावही दिलेलं आहे. म्हणजेच ही दिनदर्शिका 365 वनस्पतींची ओळख करून देणार आहे. शास्त्रीय नावं आणि अन्य माहिती डॉ. ऋतुजा कोलते, डॉ. अपर्णा वाटवे, डॉ. स्वप्ना प्रभू, डॉ. उमेश मुंडल्ये, डॉ. श्रीकांत कार्लेकर, पूर्वा जोशी यांनी तर, वसंत काळे, अश्विनी केळकर, श्रीवल्लभ साठे आणि वैभव गाडगीळ यांनी वनस्पतींच्या फोटोजसाठी साह्य केलं आहे. काही निवडक वनस्पतींचे फोटो विकीमीडिया कॉमन्सवरून घेण्यात आल्याची माहिती हर्षद यांनी दिली.

हर्षद तुळपुळे

“ जैवविविधता याविषयावर आधारीत अणसुरे परिसरामध्ये अभ्यास सुरू असताना अशा प्रकारची दिनदर्शिका प्रकाशित करावी असे अनेक दिवस विचार सुरू होते. त्याच्यातून ही दिनर्शिका तयार आणि प्रकाशित करण्यात आली आहे. आपल्या भागातील जैवविविधता, जंगली वनस्पती आदींची लोकांना माहिती मिळावी आणि ती घराघरात पोहचावी असा उद्देश आहे. ”

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com