आयुष्यभर व्यंक्या लंबोरने केली गायी-गुरांची सेवा अन् आयुष्याच्या मावळतीकडे आता.....

प्रमोद हर्डीकर
शनिवार, 27 जून 2020

आयुष्यभर व्यंक्या लंबोरने केली गायी-गुरांची सेवा,आत शरीर वाकले,पायही थकले

साडवली (रत्नागिरी) : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा पुर्‍ये धनगरवाड्यातील व्यंक्या लंबोर ही असामी आयुष्यभर गायी-गुरांची सेवा करत राहीले..आज वय वर्ष ८५ आहे,शरीर मणक्यातून वाकले आहे..पायही थकले आहेत..एकाच जागी बसुन आता ते आयुष्याच्या मावळतीकडे डोळे लावून बसले आहेत.त्यांना आता खरी मदतीची गरज आहे.

व्यंक्या लंबोर धनगराचे पोर म्हणून पुर्‍ये डोंगरावर गायी,म्हैशी,गुरे चरवण्याचे काम करत होते.शाळा नाही दुसरे काम नाही.गायी,गुरे हेच त्याचे विश्व बनले.जसजसा काळ सरकला तसा व्यंक्या लंबोर पशुधनवाला श्रीमंत असामी बनला.दुधाचे अत्पादन वाढले व शासकीय दुध डेअरीत रतीबही वाढला.पशुधन सांभाळणे ही तशी अवघड गोष्ट माञ लंबोर यांनी आयुष्यभर यातच काढल्याने त्यांनी लग्नही केले नाही.गुरे-ढोरे हाच आपला संसार मानुन काम केले.यामुळे त्यांचा अनेक ठिकाणी सत्कारही झाला.नातेवाईकांनीही या काळात चांगली साथ दिली.

हेही वाचा- अवघ्या तीन तासांत शाळा रेडी टू टीच ; गावाने श्रमदानातून केली उभी शाऴा...

आता माञ व्यंक्या लंबोर थकला आहे.मातीच्या जीर्ण झालेल्या मापांच्या घरात याचे जीर्ण शरीरही आता साथ देईनासे झाले आहे.आतेभाउ सोन्या कोलापटे व त्याची मुलगी या म्हातारबाबाची सेवा करत आहेत.पाठीचा कणा वाकला आहे तरी घरात दोन गायी व्यंक्या लंबोर बाळगुन आहे हे विशेष आहे.सोबतीला मला ऐक तरी जनावर हवे आहे हे व्यंक्याचे आजचे बोल आहेत.मातीच्या मापाचे घर एका बाजुने कोसळु लागले आहे दुसर्‍या बाजुला व्यंक्या लंबोर कोसळु लागला आहे.शासनाने याच घरात स्थलांतराची नोटीस बजावलेली आहे.अशा परीस्थितीत आयुष्यभर गायी गुरांसाठी राबलेल्या लंबोरला दोन वेळचे अन्न मिळणे गरजेचे बनले आहे.अन्नधान्य मिळाले तर नातेवाइक शिजवून घालु शकतात.यासाठी समाजातील दानशुरांनी व्यंक्या लंबोरच्या अखेरच्या काळात त्याला मदत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wnkya lambor Cattle service story in samgmeshwar ratnagiri