Accident Woman Bike : अशी वेळ कोणावर येऊ नये, एसटी चुकल्याने दुचाकीला केला हात; जाताना तोल गेला अन्, महिला ठार
Banda Police : एसटी चुकल्याने त्या शेर्ला येथे रिक्षाची वाट पाहत थांबल्या होत्या. त्याचवेळी पाडलोसच्या दिशेने जाणाऱ्या अनोळखी दुचाकी चालकाला थांबवून त्या मागे बसून घरी येत होत्या.
Accident in Banda : दुचाकीवरून तोल जाऊन खाली कोसळल्याने पाडलोस येथील महिलेचा मृत्यू झाला. लक्ष्मी नारायण माळकर (वय ६०, रा. पाडलोस-बामनवाडी) असे तिचे नाव आहे. ही घटना काल (ता. ९) सायंकाळी शेर्ला केंद्रशाळेनजीक येथे घडली.