हातखंब्यात महिलेचा ट्रकचालकाकडून खून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

रत्नागिरी - अनैतिक संबंधातून ब्लॅकमेल करून वारंवार पैसे मागत असल्याने तालुक्‍यातील हातखंबा-तारवेवाडी येथे ट्रकचालकाने महिलेचा पोटात सुरा भोसकून निर्घृण खून केल्याचा प्रकार उघड झाला.

रत्नागिरी - अनैतिक संबंधातून ब्लॅकमेल करून वारंवार पैसे मागत असल्याने तालुक्‍यातील हातखंबा-तारवेवाडी येथे ट्रकचालकाने महिलेचा पोटात सुरा भोसकून निर्घृण खून केल्याचा प्रकार उघड झाला. शमिका शिवराम पिलणकर (रा. ३२, फणसोप टाकळेवाडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी संशयित संतोष बबन सावंत (वय ३८, रा. हातखंबा तारवेवाडी, मूळ चिपळूण) याला ताब्यात घेतले असून सुरा जप्त केला आहे. 

तारवेवाडी येथे संतोष सावंत हा पत्नी सोनालीसह अडीच वर्षापासून भाड्याच्या घरात राहतो. तो ट्रकचालक म्हणून काम करतो, तर पत्नी सोनाली सिद्धाई हॉटेलमध्ये कामाला आहे. काही महिन्यांपासून शमिका पिलणकर त्यांच्याकडे ये-जा करत होती. संतोषच्या मित्राने त्याची शमिकाशी ओळख करू दिली होती. त्यानंतर त्यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले. त्याचे फोटो शमिकाने काढून ठेवले होते. त्या आधारे ती संतोषला ब्लॅकमेल करून वारंवार ५ हजार, २ हजार असे रूपये उकळत होती. आज दुपारी शमिका कपड्यांची बॅग घेऊन संतोषच्या घरी आली. संतोषची पत्नी सोनाली कामावर गेली होती. शमिका आणि संतोष यांच्यात पैशावरून जोरदार बाचाबाची झाली. शमिकाने घरातील सुरा घेऊन संतोषवर चाल केली. मात्र संतोषने तोच सुरा घेऊन तिच्या पोटात दोन वेळा भोसकला. यामुळे ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. 

त्यानंतर संतोष पत्नीला आणण्यासाठी गेला. घरातील हा प्रकार पाहून सोनालीला धक्का बसला. तीने तडक पोलिसांना कळवले. ग्रामीण पोलिस निरीक्षक सुरेश कदम, अपर पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, कर्मचारी चावरे, सुनील गायकवाड, अमित कदम, उमेश गायकवाड, प्रवीण पाटील, जाधव आणि स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी उपस्थित होते. 

कुबड्यांच्या आधाराने तो चालतो
संतोष सावंत ट्रकचालक म्हणून काम करतो. काही महिन्यांपूर्वी त्याचा अपघात झाला. त्या अपघातात त्याला अपंगत्व आले. कुबड्यांच्या आधाराने तो चालतो. अजूनही तो चालक म्हणून गाड्यांवर काम करतो. पत्नी घरी नसायची तेव्हा शमिका संतोषला भेटायला येत होती.

Web Title: women murder in Hatkhamba by Truck Driver

टॅग्स