Women’s Day 2019 महिला कामगारांसह ‘त्या’ चालवतात पेट्रोल पंप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 मार्च 2019

चिपळूण - पेट्रोल पंप चालविण्याचे काम पुरुष मंडळी करतात. मात्र, त्याला येथील मनीषा रहाटे अपवाद आहेत. महिला कामगारांच्या मदतीने पंपाचे कामकाज त्या यशस्वीपणे हाताळतात. मुंबई-गोवा हायवेवर निगडे-बोरज भागात महालक्ष्मी फ्युएल या पेट्रोल पंपावर गेले की, सर्वत्र महिला कर्मचाऱ्यांचा वावर दिसतो.

चिपळूण - पेट्रोल पंप चालविण्याचे काम पुरुष मंडळी करतात. मात्र, त्याला येथील मनीषा रहाटे अपवाद आहेत. महिला कामगारांच्या मदतीने पंपाचे कामकाज त्या यशस्वीपणे हाताळतात. मुंबई-गोवा हायवेवर निगडे-बोरज भागात महालक्ष्मी फ्युएल या पेट्रोल पंपावर गेले की, सर्वत्र महिला कर्मचाऱ्यांचा वावर दिसतो.

अगदी पंपावरील पेट्रोल भरण्याच्या मुख्य कामापासून सर्व कामे महिला अत्यंत काळजीपूर्वक करताना दिसतात. पेट्रोल पंप मालक मनीषा रहाटे यांनी महिला कामगारांच्या मदतीने स्वबळावर पंप चालविला आहे. 

मनीषा रहाटे यांचे शिक्षण सिव्हिल अभियांत्रिकीमध्ये झाले आहे. २०१२ मध्ये पेट्रोल पंपाची जाहिरात निघाली. तेव्हाही जाहिरातीमध्ये महिला आरक्षण असल्याने त्यांनी अर्ज दाखल केला. मनीषा रहाटे यांनी महिला आरक्षणाच्या नियमानुसार मिळालेल्या पंपाचे संपूर्ण कामकाज स्वतः हाताळण्याचे ठरवले. त्यांच्या घरी लहान मुलांना सांभाळण्यासाठी येणाऱ्या दोन मुलींकडे त्यांनी त्यांच्या शिक्षणाची विचारणा केली. तेव्हा या मुली बारावीमध्ये ७० टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या होत्या. मुले सांभाळण्यासाठी इतके अधिक शिक्षण घेतलेल्या मुली येत असतील यावरून त्यांना बेकारीचा अंदाज आला. 

तेव्हा कोणत्याही स्थितीत त्यांनी मुलींनाच कामावर घेऊन पंप चालवण्याचे ठरवले. मनीषांना त्यांच्या वडिलांचा मोठा पाठिंबा व सासरची मदत मिळाली. त्यांनी हिशेबाचे ऑनलाइन कामकाज सुरू केले. परिसरामध्ये हा एकमेव पंप ॲटोमॅटेड पंप म्हणून चालवला जातो.  

पेट्रोल पंप चालवण्यासाठी ग्राहक टिकवणे व त्यात वाढ करण्यासाठी सुयोग्य व्यवस्थापनाचे बळ दिले. महिला म्हणून पंप चालविताना कोणतीही अडचण भासली नाही.
 - रहाटे, संचालक, महालक्ष्मी फ्युएल, निगडे-बोरज.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Womens Day 2019 Petrol pump owner Manisha Rahate