पारंपरिक वेशभूषेत केला महिलांनी जल्लोष

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

‘सकाळ-मधुरांगण’तर्फे रॅलीचे आयोजन : वेशभूषा स्पर्धा

रत्नागिरी - सर्वच क्षेत्रांत कर्तबगारी गाजविणाऱ्या स्त्रीला सलाम करण्यासाठी ‘सकाळ-मधुरांगण’तर्फे काढलेल्या महिला बाईक रॅलीला उत्तम प्रतिसाद मिळाला. महिला व बालकल्याण सभापती शिल्पा सुर्वे यांनी श्रीफळ वाढवून रॅलीचे उद्‌घाटन केले. 

‘सकाळ-मधुरांगण’तर्फे रॅलीचे आयोजन : वेशभूषा स्पर्धा

रत्नागिरी - सर्वच क्षेत्रांत कर्तबगारी गाजविणाऱ्या स्त्रीला सलाम करण्यासाठी ‘सकाळ-मधुरांगण’तर्फे काढलेल्या महिला बाईक रॅलीला उत्तम प्रतिसाद मिळाला. महिला व बालकल्याण सभापती शिल्पा सुर्वे यांनी श्रीफळ वाढवून रॅलीचे उद्‌घाटन केले. 

महिला बाईक रॅलीत शहरातील सर्वच क्षेत्रातील महिला सहभागी झाल्या. महिला पारंपरिक वेशभूषेसह सहभागी झाल्या. स्वच्छ रत्नागिरी, सुंदर रत्नागिरी, नारी शक्‍ती झिंदाबादच्या घोषणांनी रत्नागिरी दणाणून सोडले.
मारुती मंदिरपासून रॅलीला सुरवात झाली. स्वच्छ रत्नागिरी, सुंदर रत्नागिरी, नारीशक्‍ती झिंदाबाद आदी घोषणा देत माळनाका, जयस्तंभ, राम आळी, गोखले नाका, गाडीतळ येथील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला हार अर्पण करून महिलांनी अभिवादन केले. त्यानंतर धनजी नाक्‍यावरून शिर्के प्लाझा येथे दै. सकाळ रत्नागिरी विभागीय कार्यालय येथे रॅलीचा समारोप झाला.

या रॅलीमध्ये मधुरांगणच्या सभासदांसह सौ. जया सामंत, लायन्स क्‍लबच्या अध्यक्ष सौ. क्षिप्रा कोवळे यांच्यासह अनेक महिला सभासद सहभागी झाल्या. या रॅलीचे संयोजन मधुरांगणच्या संयोजिका सौ. श्रद्धा तेरेदेसाई यांनी केले. त्यांना सर्व सभासदांनी सहकार्य केले. रॅलीमध्ये नटून थटून आलेल्या महिलांची वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. 

भाई वडापावतर्फे महिलांना अल्पोपहार
शहरातील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक व भाई वडापावचे संचालक पंकज शिंदे यांनी महिला दिनानिमित्त रॅलीमध्ये सर्व महिलांना अल्पोहार दिला. भाईवडा या ब्रॅंडने अत्यल्प कालावधीत उत्तम प्रगती करत रत्नागिरीत एकूण चार शाखा स्थापन केल्या आहेत. भाईवडा, सॅंडवीच, पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फाइज आदी पदार्थ मिळातात. शहरातील दत्तराज सेल्स यांनी या कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले.

१० ला बक्षीस वितरण
वेशभूषा स्पर्धेचा निकाल ‘सकाळ-मधुरांगण’च्या ‘टॉक टाइम’ शोमध्ये जाहीर करून बक्षीस वितरण केले जाणार आहे. हा कार्यक्रम गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात १० मार्चला सायंकाळी ६.३० वाजता केला जाणार आहे. जास्तीत जास्त महिला, नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन ‘सकाळ-मधुरांगण’तर्फे करण्यात आले आहे.

Web Title: womens day celebration