सावर्डेत जागर महिलाशक्तीचा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

सावर्डे - सावित्रीच्या आम्ही लेकी, नारीची दाखवू एकी, महिलाशक्तीचा विजय असो अशा जयघोषात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला शक्तीचा जागर केला. तनिष्का व्यासपीठ आणि ग्रामपंचायत सावर्डेच्या माध्यमातून आज जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. रांगोळी, रक्तदान, पोवाडा गायन, गीत गायन, व्याख्यान, फनीगेम्स आदी कार्यक्रमांनी महिला दिनीच्या कार्यक्रमात रंगत भरली. 

‘सकाळ माध्यम समूहा’च्या तनिष्का व्यासपीठ सावर्डे विभागाच्या वतीने दरवर्षी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. यंदाही मोठ्या उत्साहाने चिपळूण तालुका तनिष्का प्रमुख पूजा निकम यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिज्योत रॅलीचे काढण्यात आली. शिक्षणमहर्षी गोविंदरावजी निकम यांच्या स्मारकापासून मुंबई-गोवा महामार्गावरून एमबीए महाविद्यालयापर्यंत महिलांनी रॅली काढली. रॅलीमध्ये कॉलेज तरुणीपासून वयोवृद्ध महिला सहभागी झाल्या होत्या. निकम स्मारकावर सह्याद्री शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा निकम यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करण्यात आली. क्रांतिकारी व कर्तबगार महिलांचा जयघोष करत ढोल आणि ताशांच्या गजरात रॅलीला काढण्यात आहे. 

रांगोळी स्पर्धेचे उद्‌घाटन सह्याद्री शिक्षण संस्थेच्या विश्‍वस्त आकांक्षा पवार यांच्या हस्ते करण्यात आले, तर रक्तदान शिबिराचे उद्‌घाटन सावर्डे गावचे सरपंच सुभाष मोहिरे, उपसरपंच शरद चव्हाण, देवराज गरगटे, चंद्रकांत सावंत, विजय होडे, मजिद मुल्लाजी, जमीर मुल्लाजी, सानिका चव्हाण, कंचन पवार, प्रिया पाटील, वैशाली पाटील, रेणुका राजेशिर्के, सफिना मोडक, तुषार बिजीतकर, विनय खानविलकर आदी मान्यवर उपस्थित होते. एमबीए कॉलेजमध्ये वाजत गाजत आलेल्या क्रांतिज्योती रॅलीचे स्वागत महिलांनी केले. त्यावेळी फटाक्‍याची आतषबाजी करण्यात आली.

कॉलेजच्या तरुणी भगवे फेटे बांधून रॅलीत सहभागी झाल्या होत्या. यावेळी बी. एड. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पोवाडा, गीतगायन केले. प्रा. सुवर्णा देसाई यांनी ‘महिला एक अभेद शक्ती‘ याविषयी व्याख्यान दिले, तर रक्तदान शिबिरामध्ये ३७ जणांनी रक्तदान केले. संध्याकाळी फनिगेम्स कार्यक्रम घेण्यात आला.

Web Title: womens day celebration in savarde