esakal | भूमिगत विजवाहिन्यांचे काम ४० टक्केच ;२ वर्षात ३८ कोटींचा फटका
sakal

बोलून बातमी शोधा

Power line underground plan stalled in ratnagiri

भूमिगत विजवाहिन्यांचे काम ४० टक्केच ;२ वर्षात ३८ कोटींचा फटका

sakal_logo
By
- राजेश शेळके

रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळाचा धोका वाढत चालल्याचे फयान,निसर्ग आणि तौत्के वादळाने अधोरेखित झाले. गेल्या २ वर्षात महावितरणला ३८ कोटींचा फटका बसला. आपत्ती व्यवस्थापनाच्यादृष्टीने रत्नागिरी तालुक्याच्या किनारपट्टी भागात ९७ कोटीचा भूमिगत विद्युतवाहिन्यांचा पथदर्शी प्रकल्प सुरू आहे. त्याचे ३५ ते ४० टक्के काम झाले आहे. ३६.६ किमी उच्चदाब वाहिनी तर ५०.४६ किमी लघुदाबाच्या भूमिगत वाहिनी टाकुन झाल्या आहेत. भूमिगत विद्युत वाहिन्यांचे जाळे कोकण किनारपट्टी भागात पूर्ण झाले तर विद्युत कंपनीची हानी टाळता येणार आहे. मात्र पाऊस, खोदाईच्या परवानग्या आणि कोरोनामुळे हे काम थांबले आहे. (work-of-underground-power-lines-is-only-40-percent-kokan-marathi-news)

दिल्लीच्या लिना पॉवरटेक एजन्सीला हे काम दिले आहे. रत्नागिरी शहर आणि ग्रामीण परिसरातील चक्रीवादळ प्रवण क्षेत्रात हानी रोखण्यासाठी ९७.०१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या अंतर्गत भूमिगत विद्युतवाहिन्या टाकण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. सद्यःस्थितीत या अंतर्गत रत्नागिरी शहर आणि परिसरात प्रस्तावित १०१.३२ किमी उच्चदाब वहिनीपैकी ३६.६ किमी तर प्रस्तावित लघुदाब २२३.२५ किमीपैकी ५०.४६ किमी भूमिगत विद्युतवाहिन्यांचे काम पूर्ण झाले आहे.

हेही वाचा- दापोली तालुक्यात धुवाँधार; हर्णेसह परीसरीतील गावांना स्थलांतराच्या सूचना; 2 दिवस घराबाहेर न पडण्याचे आदेश

वादळानंतर आपत्ती व्यवस्थापनाला दुरुस्तीसाठी मोठा कालावधी लागतो. हे नुकसान आणि गैरसोय टाळण्यासाठी महावितरण कंपनीने केंद्र सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत किनारपट्टी भागातील ओव्हरहेड उच्च दाबाच्या विद्युतवाहिन्या भूमिगत करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण होण्याची गरज आहे; मात्र स्थानिक पातळीवर काही ठिकाणी जागेची अडचण येत असल्याने काम जैसे थे आहे. नैसर्गिक आपत्तीत सर्वात जास्त फटका बसला आहे तो महावितरण कंपनीला.हल्ली जवळपास नियमित होणाऱ्या या नैसर्गिक आपत्तीत भूमिगत विद्युतवाहिन्या या नक्कीच उपयुक्त ठरतील. या पार्श्वभूमीवर सध्या महावितरण कंपनीच्या अंतर्गत भूमिगत विद्युतवाहिन्या, त्यांची पूर्वतयारी याचा आढावा घेतला असता आशादायक चित्र समोर आले आहे.

एकात्मिक ऊर्जा विकासअंतर्गत काही काम

एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या ३६ कोटी ७९ लक्ष रुपये निधीतून भूमिगत विद्युतवाहिन्याचे काम करण्यात आले. यामध्ये राजापूर शहरांतर्गत ६ किलोमीटर लघुदाब वाहिनी, खेड येथे ३०.४ किलोमीटर तर दापोली येथे १५ किलोमीटर उच्चदाब अशी ४५ कि.मी. विद्युतवहिनी पूर्ण झाली आहे. याशिवाय खेड शहराअंतर्गत ३० कि.मी. लघुदाब वाहिनी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आली आहे. चिपळूण शहरातदेखील २०० मीटर लांबीच्या उच्चदाब वहिनीचे काम पूर्ण झाले आहे.