पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील कामगारांचा हक्कासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा

लक्ष्मण डुबे 
रविवार, 25 मार्च 2018

पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील कारखाने बंद करून काढून टाकलेल्या कामगारांच्या मागण्यांबाबत सोमवार पासुन कामगारांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

रसायनी (रायगड) - पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील जयसिंथ डायकेम लि. आणि जयसिंथ अँन्थ्रोक्युनोन्स लि. कारखाना बंद करून काढून टाकलेल्या कामगारांच्या मागण्यांबाबत सोमवार (ता. 26) पासुन कामगारांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान याच दिवशी पनवेल येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात बैठक बोलविण्यात आली आहे. बैठकीत मागण्यांबाबत व्यवस्थापनाने तडजोड केली नाही तर कारखान्याच्या प्रवेशव्दारा समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करू, असे कामगारांनी सांगितले. 

पाताळगंगा औद्योगिक वसाहतीतील जयसिंथ डायकेम लि. आणि जयसिंथ अँन्थ्रोक्युनोन्स लि हे कारखाने कंपनीच्या मालकाने सोळा वर्षापुर्वी टाळेबंदीच्या नावाखाली बंद केला आणि कामगारांना काढून टाकले आहे. कारखाना बंद झाल्यामुळे सुमारे पाचशे चाळीस कामगारांनवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. तसेच या कामगारांची संपूर्ण देणी व्यावस्थापनाने दिली नाही. त्यामुळे कामगारांनी कोकण श्रमिक संघ अध्यक्ष शाम म्हात्रे यांच्या संघटनेच्या नेतृत्वा खाली  मागण्यांन  बाबतचा पाठपुरावा काही वर्षा पासुन सुरू ठेवला आहे. 

कारखाना बंद झाला तेव्हा त्यावेळी असोसिएशन ऑफ केमिकल्स वर्क्स या कामगारांच्या युनियनने सदर प्रकरण न्यायालयात नेले आणि कामगारांचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र कंपनीने तात्कालिन युनियनला हाताशी धरुन कामगारांची फसवणुक केली आसा आरोप कामगार करत आहे. दरम्यानच्या काळात कंपनीने थोडयाशा रक्कमांचे वाटप केले. ही रक्कम टाळेबंदीच्या काळातील वेतनाची म्हणुन दिली होती. असे कामगारांचे म्हणने आहे. कंपनीने आमची कायदेशीर देणी द्यावी किंवा कंपनीच्या सेवेत सामावुन घ्यावे, अशी आमची मागणी आहे. असे कामगारांनी सांगितले.

कारखाना बंद पडला होता. त्यावेळेच्या यूनियन आणि व्यवस्थापनाने संगनमताने कामगारांची फसवणुक केली आहे. तसेच व्यवस्थापनाने कारखाना मे. जेडी आँर्गोकेम लि. नावाने सुमारे दहा वर्षापासून सुरू केला आहे. या कामगार भरतीत जुन्या कामगारांना डावले असल्याचे  असे भाऊ ठाकुर आणि ज्ञानेश्वर माळी या कामगारांनी सांगितले.

Web Title: Workers in industrial sector of Patalganga have warned of a strong protest movement