कातळशिल्पांचा काळ, सांस्कृतिक महत्त्व आधुनिक तंत्राने अभ्यासण्याची गरज

मकरंद पटवर्धन
बुधवार, 26 डिसेंबर 2018

रत्नागिरी - कोकणातील कातळ खोदशिल्प जतन करण्यासाठी त्यांचा सर्व अंगांनी अभ्यास होणे गरजेचे आहे. तिथली जैवविविधता, प्राणीजीवन, तसेच आताची स्थिती याबाबत अभ्यास व्हावा. आतापर्यंत ज्या 52 साइट्‌स सापडल्या त्या प्रत्येकामध्ये प्रत्येकाचे स्वतंत्र वैशिष्ट्य आहे, कातळशिल्पांचा काळ निश्‍चित करण्यासाठी व त्याचे सांस्कृतिक महत्त्व शोधण्यासाठी आधुनिक तंत्राने अभ्यास करण्यावर तज्ज्ञांचे एकमत झाले.

राज्य शासनाचा पुरातत्त्व विभाग आणि निसर्ग यात्री संस्थेच्यावतीने पाच दिवसांची कार्यशाळा आयोजित केली आहे. यामध्ये चार दिवस कातळशिल्पे पाहण्यासाठी भ्रमंती करण्यात येत आहे. काल याबाबतचे चर्चासत्र अल्पबचत सभागृहात झाले. प्रथमच या शिल्पांच्या बाबतीत वेगवेगळ्या विषयाचे तज्ज्ञ एकाच व्यासपीठावर आले.

पुरातत्त्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, इंडोलॉजीस्ट ऋत्विज आपटे आणि धनंजय मराठे उपस्थित होते.

कातळचित्रांचा एकत्रित अभ्यास व्हावा. एकाच रेषेत काढलेली, जितकी ओळखीची पण तितकीच गूढ असलेली कोकण कड्यावरील कातळ खोद शिल्पांचा एकत्रित अभ्यास झाला पाहिजे. 

-  सुधीर रिसबूड, संशोधक

आजपर्यंत रत्नागिरी, लांजा आणि राजापूर तालुक्‍यातील 52 गावांतील 90 ठिकाणावरील तब्बल 1200 कातळचित्रांचा शोध लागला आहे. त्यातील प्राणी, पक्षी, मनुष्यवृत्ती याबद्दलही रिसबूड यांनी निरीक्षणे नोंदली. जगाचा मानवी इतिहास अभ्यासताना पाषाण, धातू आणि लाकडावर आधारित संस्कृती गेली. त्याचा परिणाम भारतावर दिसतो. आफ्रिका ते चीन अशा संस्कृतीच्या प्रवासामध्ये भारत हे महत्त्वाचे माध्यम असावे किंवा या संस्कृतीचा जन्मही भारतातून झाला असावा, असा अंदाज डॉ. पार्थ चौहान यांनी व्यक्त केला.

कातळशिल्पे रत्नागिरीत आढळून आली ती देशभरामध्ये अन्य कुठेही आढळून आलेली नाहीत. त्यांचा अत्याधुनिक तंत्राने अभ्यास व्हायला हवा.

- डॉ. पार्थ चौहान

Web Title: workshop on Petroglyphs of Konkan