दोन रुपयांची झेरॉक्‍सही पेटीएमने!

Xerox-paytm
Xerox-paytm

पाली - नोटाबंदीमुळे निर्माण झालेली सुट्या पैशांची कमतरता अजूनही कायम असल्याने पेटीएमसारख्या मोबाईल वॉलेट ॲपचा वापर सुरू झाला आहे. ठराविक व्यवहारांसाठी मर्यादित असलेला हा वापर आता येथील सुविधा केंद्रावरही सुरू झाला आहे. अगदी दोन रुपयांच्या झेरॉक्‍सचे पैसेही पेटीएमद्वारे स्वीकारले जात आहेत. ही व्यवस्था गुरुवारपासून (ता. २२) सुरू करण्यात आली. 

खिशात रोख, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड नसले तरी आपल्या ॲन्ड्रॉईड फोनमध्ये असलेल्या पेटीएम सारख्या ॲपमधून पैशांची देवाण-घेवाण किंवा वस्तू खरेदी करणे शक्‍य झाले आहे. अट एवढीच की आपल्या पेटीएमच्या वॉलेटमध्ये पुरेसे पैसे असायला हवेत. सर्वच ठिकाणी या वॉलेटचा उपयोग करता येईल असे नाही. त्यामुळे दोन रुपयांची झेरॉक्‍स किंवा पाच रुपयांची प्रिंट काढायची असेल तर सुट्या पैशांशिवाय पर्याय नाही. त्या वेळी ग्राहकांनी अगदी शंभर किंवा पन्नासची नोट काढून दिल्यास त्यांना सुट्टे पैसे देणे म्हणजे दुकानदारांना दिव्यच वाटत आहे. नाइलाजाने ग्राहकांना परत पाठवावे लागते. ही अडचण लक्षात घेऊून येथील सुविधा सेंटरचे मालक संतोष बावधने यांनी झेरॉक्‍ससह, प्रिंटिंग, वीज व फोनबिल, रेल्वे व बस तिकीट बुकिंग आणि महाऑनलाईन सेवा या सर्वच व्यवहारांचे पैसे पेटीएमद्वार स्वीकारण्याची सोय केली आहे. त्यामुळे त्यांची व ग्राहकांचीही सुट्या पैशांची चिंता मिटली आहे. वेळेचीही बचत होत आहे.
 

महाऑनलाईन सेवांमध्येही पर्याय
ऑनलाईन व्यवहार करतेवेळी प्रामुख्याने बॅंक, डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा पर्याय दिला जातो. काही दिवसांपासून शॉपिंग, बिलभरणा, ई-टिकिटिंगबरोबरच महाऑनलाईनसारख्या सरकारी सेवांचा वापर करतानाही तेथे पेटीएमचा पर्याय दिला जात आहे, असे सुविधा सेंटरचे नागेश बुरुंगुले यांनी सांगितले. लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा अर्ज भरणे, गॅझेट किंवा सरकारची विविध प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी लागणारी फी पेटीएमद्वारा भरण्याची व्यवस्था केल्याने विद्यार्थी व ग्राहकांची चांगली सोय झाली आहे. पेटीएमचा वापर सोपा असल्याने वेळेचीही बचत होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com