यंदा महाविद्यालयीन निवडणुकांचे बिगुल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जुलै 2019

कणकवली - गेल्या 25 वर्षापूर्वी बंद पडलेल्या उच्च महाविद्यालयातील निवडणुकांचे बिगुल यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून वाजणार आहे. राज्यातील 11 विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यात सुधारणा करून हा कायदा 1 मार्चपासून लागू झाला आहे. त्यामुळे येत्या 31 जुलैपर्यंत महाविद्यालयीन निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्‍यता आहे. 

कणकवली - गेल्या 25 वर्षापूर्वी बंद पडलेल्या उच्च महाविद्यालयातील निवडणुकांचे बिगुल यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून वाजणार आहे. राज्यातील 11 विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यात सुधारणा करून हा कायदा 1 मार्चपासून लागू झाला आहे. त्यामुळे येत्या 31 जुलैपर्यंत महाविद्यालयीन निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्‍यता आहे. 

तरूण पिढी सामाजिक आणि राजकीय क्षेत्राकडे येण्याचे प्रमाण कमालीचे घटले आहे. राजकीय पक्षांच्या युवा संघटनाही फारशा सक्रीय राहिलेल्या नाहीत. याचे कारण महाविद्यालयीन पातळीवरील विद्यार्थी संघटना निष्क्रीय झाल्या आहेत. 25 वर्षापूर्वी महाविद्यालयीन विद्यापीठ परिषद निवडणुकामध्ये घडलेल्या एका दुर्घटनेनंतर विद्यापीठाच्या या प्रतिनिधी निवडीच्या निवडणुका औपचारीकपणे पार पाडल्या जात होत्या. मात्र उच्चशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी गेल्यावर्षी या निवडणुका घेण्यासंदर्भात सुतोवाच केले होते. त्यानुसार लिंगडोह समिती नेमण्यात आली.

या समितीच्या शिफारशीनंतर विद्यापीठ कायद्यात बदल करण्यात आला. त्यामुळे शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये या निवडणुका होवू घातल्या आहेत. त्यामुळे कॉलेज कॅम्पसमध्ये आता राजकीय वातावरण तापण्याची शक्‍यता आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, युवा सेना, छात्रभारती अशा विविध संघटना आता सक्रीय होवू लागल्या आहेत. या संघटनांनी सदस्य नोंदणीही सुरू केली आहे. या निवडणूकांचे वेळापत्रक लवकरच घोषित होणार असून महाविद्यालयीन निवडणुकांसदर्भात उच्चशिक्षण विभागाने 17 जुलैला मुंबईत बैठकीचे आयोजन केले आहे.

या बैठकीनंतर निवडणुक वेळापत्रक जाहीर होण्याची शक्‍यता आहे. महाविद्यालयीन निवडणूका कशा पद्धतीने घ्याव्या याबाबत माजी कुलगुरू डॉ. आर. एस. माळी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने निवडणूकांचे नियम तयार केले आहेत. या नियमानुसारच निवडणुका होणार आहेत. 

निवडणुक लढविण्यासाठी पात्रता -

  • उमेदवार मान्यताप्राप्त अभ्यासक्रमाचा नियमीत विद्यार्थी असावा
  • विद्यार्थ्याला एटीकेटी नसावी
  • विद्यार्थी एकाच वर्गात पुन्हा प्रवेश घेतलेला नसावा
  • उमेदवाराचे कमाल वय 25 वर्षे असावे
  • राखीव प्रवर्गासाठी जातप्रमाणपत्र बंधनकारक

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This year college elections in Sindhudurg