यंदा सावंतवाडीत सहा दिवसांचा पर्यटन महोत्सव

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

सावंतवाडी : येथिल पालिकेच्यावतीने आयोजित करण्यात येणारा पर्यटन महोत्सव यंदाच्या वर्षी सहा दिवस घेण्यात येणार आहे. 26 ते 31 डींसेबर या काळात तो होणार आहे. अशी माहीती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान पुर्वी झालेल्या मासिक बैठकीत त्यासाठी दहा लाख रुपयाच्या खर्चाला मंजूरी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला उपनगराध्यक्षा अन्नपुर्णा कोरगावकर, दिपाली सावंत, भारती मोरे, माधुरी वाडकर, आनंद नेवगी, शुभांगी सुकी, बाबू कुडतरकर आदी उपस्थित होते. 

साळगावकर म्हणाले, नुकत्याच झालेल्या बैठकीत शहरातील काही महत्वाच्या मुद्यांवर निर्णय घेण्यात आले. यात यावर्षीचा पर्यटन महोत्सव सहा दिवसाचा करण्याचा निर्णय घेण्यात आला तर शहरासाठी 46 कोटी रुपयाची नळपाणी योजनेला मंजुरी देण्यात आली. शहरातील 85 अपंगाना मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच तालुका क्रीडा संकुल उभारण्याबाबत चर्चा करुन निर्णय घेण्यात आला. 
दरम्यान यावर्षी सौरऊर्जेवर चालणारी यंत्रणा वापरुन पालिकेचे विविध प्रकल्प सौर ऊर्जा युक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

यात पालिकेच्या नाट्यगृहासाठी 6 लाख, नगर परिषदेसाठी 24 लाख, लाखे वस्तीसाठी 25 लाख, स्पोटर्स कॉम्प्लेक्ससाठी 22 लाख रुपयाची तरतूद करण्यात आली. साळगावकर पुढे म्हणाले, कारीवडे येथे उभारण्यात येणार्‍या कचरा प्रकीया प्रकल्पाकडे बंदीस्त शेड उभारण्यात येणार आहे. त्यासाठी एक कोटी सोळा लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. खासदार राणेंनी दिलेल्या चार लाखाच्या निधीतून शहरात चार ठीकाणी हायमास्ट उभारण्यात आले आहेत
.भुसंपादनावर भर 

यावेळी नगराध्यक्ष साळगावकर म्हणाले, येणार्‍या काळात सावंतवाडी पालिकेला मिळालेल्या निधीतून भू-संपादन करण्यासाठी भर देण्यात आला आहे. महत्वाचे प्रकल्प आणी पुढच्या काही वर्षाचे नियोजन होणे गरजेचे असल्यामुळे आरक्षीत जागा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न असणार आहे. त्यामुळे शहर विकासासाठी काही निधी कमी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: This year six-day tourism festival in Sawantwadi