
रत्नागिरी : योगेश कदमांचे तिकीट कापण्याचा बेत
चिपळूण : जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब(anil parab) यांनी, माजी मंत्री रामदास कदम (ex. minister ramdas kadam) यांच्याशी वैर घेतल्यानंतर शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या युक्तीप्रमाणे दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी(ex mla surykant dalvi ), संजय कदम आणि पालकमंत्री अनिल परब एकत्र आले आहेत. आमदार योगेश कदम (mla yogesh kadam )यांचे २०२४ च्या निवडणुकीत तिकीट कापण्याचा बेत या तिघांनी आखल्याचा संशय कदम पिता-पुत्रांना आहे.
किरीट सोमय्या(kirit somiaya) यांना पालकमंत्री अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्टची माहिती रामदास कदम यांनी पुरवल्याचा कथित व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर परब यांनी कदम यांच्या विरोधातील भूमिका तीव्र केली. संघटनेत त्यांचे महत्त्व कमी करण्याबरोबरच कदम समर्थकांचेही खच्चीकरण करण्यास सुरुवात केली. कदम यांना विधानपरिषदेचे(vidhanparishad) तिकीट पुन्हा मिळणार नसल्याचे नक्की झाले. दापोली नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना सूर्यकांत दळवी हे शिवसेना सोडून राष्ट्रवादीत निघाले होते.त्यांचा प्रवेशही निश्चित झाला होता; मात्र परब यांनी दळवी यांची समजूत काढली. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत होणाऱ्या संभाव्य घडामोडीची माहिती दळवींना देत, त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश थांबवला.
हेही वाचा: रामदास कदम शिवसेना सोडणार? पत्रकार परिषदेत फोडणार बॉम्ब
अप्रत्यक्षरित्या ठाकरेही लक्ष्य
कदम यांनी परब यांच्यावर जोरदार आरोप करत अप्रत्यक्षरित्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही लक्ष्य केले. उद्धव ठाकरे हे सध्यातरी परब यांच्या बाजूने झुकल्याचे दिसते. त्यामुळे या वादाची परिणिती कदम यांच्यासाठी नकारात्मक असेल, असा अंदाज आहे.
हेही वाचा: शिवसेना नेते रामदास कदम अन् आमदार योगेश कदमांना मोठा धक्का
संघटनेत राहणार नाहीत, यासाठी रणनीती
दरम्यान, नगरपंचायत निवडणुकीत कदम पिता-पुत्रांना डावलून दळवी यांच्याकडे सूत्रे दिली. परब यांनी स्वतंत्रपणे निर्णय घेत, कदम यांचे उत्तर रत्नागिरी संघटनेतील पंख पुरते छाटून टाकले. त्यांच्या मतदारसंघातील शिवसेना संघटनेत बदल करत, कदम समर्थकांना बाहेरचा रस्ता दाखवला. पालिका निवडणूक प्रचारात कदम यांची गद्दार म्हणून हेटाळणी झाली. या साऱ्या अपमानानंतर कदम यांनी परब यांचे नाव घेत, जाहीर हल्लाबोल केला. परब यांनी थेट उत्तर दिले नसले तरी कदम हे संघटनेत राहणार नाहीत, यासाठी रणनीती आखली जात असल्याची चर्चा आहे.
Web Title: Yogesh Kadams Plan To Cut Tickets Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..