पोलीस दादा जरा जेऊन घ्या म्हणत रत्नागिरीतील युवक आले पुढे....

Young entrepreneurs took initiative and provided food to the police kokan marathi news
Young entrepreneurs took initiative and provided food to the police kokan marathi news

रत्नागिरी  : कोरोनाचा प्रसार रोखून जनतेचे आरोग्य उत्तम राहावे यादृष्टीने अहोरात्र मेहनत घेणारे आणि ड्युटी बजावणाऱ्या पोलिसांप्रती येथील उद्योजकांनी ऋण आणि माणुसकी दाखवले आहे. संचारबंदीच्या कडक अंमलबजावणीसाठी रस्त्यावर असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना या उद्योजकाने जेवण वाटप केले आहे.

हेही वाचा- ते विनापरवाना समुद्रामार्गे बोटीमधुन आले अन्....
युवा उद्योजकांनी पुढाकार घेत पोलिसांना दिले जेवण 
आजच्या घडीला संपूर्ण जग हे कोरोनामुळे भयभीत आहे. कोरोनाला अतितटीचा लढा देत आहे. आपल्या देशातसुद्धा या आजारामुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा कठीणप्रसंगी प्रशासन आपल्या परीने ठोस उपाययोजना करीत आहे. आरोग्य आणि पोलिस कर्मचाऱ्यांचे काम कौतुकास्पद आहे. पोलिस बांधव हे रात्रंदिवस रस्त्यांवर आपल्या संरक्षणासाठी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कर्तव्य बजावत आहेत.

रत्नागिरीत माणुसकीचे दर्शन

सर्वच हॉटेल्स बंद असल्यामुळे आपले कर्तव्य बजावत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नास्ता आणि जेवनाची गैरसोय होत आहे. अशा प्रसंगी रत्नागिरीतील हॉटेल आमंत्रणचे मालक सिद्धेश कदम, हॉटेल सुरभीचे प्रभात भालेकर आणि हनुमान कॉर्नरचे कृणाल शेरे या युवकांनी पुढाकार घेत कर्तव्य बजावत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना नास्ता आणि जेवण पुरवले. त्यांच्या या कार्याबद्दल पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांना धन्यवाद दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com