या कोरोनाच्या अफवेने सोडले त्या माऊलीने जग...

The elderly woman committed suicide by jumping into the rever kolhapur marathi news
The elderly woman committed suicide by jumping into the rever kolhapur marathi news

नागाव (कोल्हापुूर) : कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या भीतीने वृध्द महिलेने पंचगंगेत उडी घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी ( ता. २६ ) रात्री नऊच्या सुमारास हनुमान नगर, शिये येथे कसबा बावड्याच्या हद्दीत नदी किनार्‍यावर त्यांचा मृतदेह मिळाला.   
श्रीमती मालुबाई आकाराम आवळे ( वय ६८, रा.  खुशबू इंडस्ट्रीज, एमआयडीसी, शिरोली, मुळ रा.  वंदूर ता. कागल ) असे त्यांचे नाव आहे. कोरोनामुळे नव्हे, मात्र कोरोनाच्या धास्तीने जिल्ह्यातील हा पहिला बळी घेतला आहे. 

याबाबत घटनास्थळी मिळालेली माहिती अशी :

श्रीमती मालुबाई आवळे या आपला मुलगा बाळू, सून व नातवंडांसोबत शिरोली औद्योगिक वसाहतीमधील खुशबू इंडस्ट्रीज येथे राहत होत्या. त्यांचा मुलगा बाळू हा त्या कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. बाळू आवळे यांनी टोप येथील बिरदेव मंदिराच्या मागील बाजूस छोटे घर बांधले आहे. मुले मोठी असल्यामुळे ते आई आणि मुलांना कंपनीत ठेवत व स्वतः टोप येथील घरात झोपण्यासाठी जात होते. रविवार ( ता. २२) पासून औद्योगिक वसाहत बंद असल्याने मालुबाई आपल्या नातवंडांना सातत्याने औद्योगिक बंद असल्याचे कारण विचारत होत्या. यामध्ये त्यांना नातवंडांकडून कोरोना या संसर्गजन्य आजाराची माहिती मिळाली. हा आजार वृध्द व्यक्तींना होतो. आणि त्यांच्यामार्फत हा इतरांना होतो असा समज त्यांनी करून घेतला. या कारणामुळे त्यांनी दोन दिवस जेवणही घेतले नाही.

त्यापेक्षा मीच निघून जाते अस ती म्हणाली अन्

गुरुवारी सकाळी त्या अचानक घरातून बाहेर पडल्या. त्यांच्या मुलाने व नातवंडांनी त्यांचा शोध घेतला. काल उशिरा त्यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्या बेपत्ता असल्याची माहिती दिली. दरम्यान नदी पात्रात अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मृतदेह मिळालेल्या ठिकाणी बाळू आवळे यांना नेण्यात आले. माझ्यामुळे कोणाला कोरोनाची लागण नको, त्यापेक्षा मीच निघून जाते असे आई म्हणायची असे बाळू आवळे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com