सावर्डेमध्ये तरुण व महिलांचा उत्साह

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

सावर्डे - जिल्ह्यात प्रतिष्ठेची निवडणूक असलेल्या सावर्डे गटामध्ये अतिशय टिच्चून मतदान झाले. सावर्डे जिल्हा परिषद गटामध्ये तरुण व महिला मतदारांनी सकाळपासून रांगा लावल्या होत्या. सर्वच केंद्रांवर पहिल्या दोन तासांत १५ ते २० टक्के मतदान झाले होते. कार्यकर्ते वयोवृद्ध मतदारांना मतदानासाठी आणत होते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये काट्याची टक्कर आहे. 

राष्ट्रवादीकडून युगंधरा राजेशिर्के व शिवसेनेकडून बाळकृष्ण जाधव एकमेकासमोर उभे ठाकले आहेत. प्रचाराची रणधुमाळी थांबल्यानंतर एक दिवस कार्यकर्त्यांनी रात्र जागून काढली. आपल्या मतदारांना राखत विरोधकांचे मतदान आपल्याला कसे फोडता येईल यासाठी रात्री जागविण्यात आल्या. पोलिसांची करडी नजर असतानाही कार्यकर्ते वाहने पळवत होते. 

आज सावर्डे गटातील राष्ट्रवादीच्या उमेदवार युगंधरा राजेशिर्के व पंचायत समितीच्या उमेदवार पूजा निकम यांनी सकाळी आठ वाजता सह्याद्री शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा निकम प्रकाश राजेशिर्के, प्रशांत निकम, पूर्वा निकम यांनी सावर्डे शिक्षक कॉलनी शाळेत मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनी नऊ वाजता कॉलनी शाळेत मतदान केले. 

सावर्डे, कासारवाडी, दहिवली खुर्द, कुंभारवाडी या मतदान केंद्रावर मतदान धिम्या गतीने सुरू होते. सावर्डे-कुंभारवाडी केंद्रावर तुरळक गर्दी होती. काही ठिकाणी मतदान केंद्रावर पोलिस कार्यकर्त्यांबरोबर हुज्जत घालीत होते. हे प्रकार वगळता सर्वत्र शांततेच मतदान सुरू होते. कोंडमळा येथील मतदान केंद्रावर ७ किलोमीटर अंतरावरून धनगरवाडीतील महिलांनी रखरखीत उन्हातून चालत येऊन मतदान केले. दहिवली खुर्द येथील पार्वती कदम या ८५ वर्षे महिलेने तीन किलोमीटर अंतरावर चालत जाऊन मतदान केले. पोलिस यंत्रणा सर्वत्र लक्ष ठेवून होती. काही नवमतदारांनी उत्साहाने मतदान केल्याचा आनंद व्यक्त केला.

Web Title: young women voting